शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात NCP शरद पवार गटाच्या आमदाराला मारहाण; सत्ताधारी अजित पवारांच्या समर्थकांसोबत वाद
2
नकाशावरून भारताचा इशारा, आता पाकिस्तानी सैन्यानं दिली पोकळ धमकी: "यापुढे युद्ध झालं तर..."
3
३० वर्षांचे गृहकर्ज होईल व्याजमुक्त; फक्त 'इतकी' SIP सुरू करा आणि व्याजापेक्षा जास्त पैसे कमवा
4
अमित शाहांची रणनीती, बंद दाराआड पाऊण तास खलबतं; CM फडणवीस अन् दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा
5
स्वामी चैतन्यानंदचे सोशल मीडियावरही 'चाळे'; मुलींच्या फोटोंवर कमेंट्स, स्क्रीनशॉट्स व्हायरल
6
४४ वर्षांपूर्वी 'या' बँकेने जारी केलं होतं पहिलं क्रेडिट कार्ड! आता देशभरात किती लोक वापरतात?
7
दिल्लीत केनियाचा खेळाडू आणि दोन प्रशिक्षकांवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; भाजप म्हणतेय... 'कलंक'
8
6 लाखांपेक्षाही खाली आली Maruti Baleno ची किंमत, GST कपातीशिवायही मिळतोय ढासू डिस्काउंट 
9
इतकी मोठी झाली उर्मिला-आदिनाथ कोठारेची लेक जिजा, दिसायला आहे आईची कार्बन कॉपी
10
राधाकिशन दमानींच्या DMart चा दुसऱ्या तिमाहीत महसूल वाढीचा धमाका; शेअरवर 'फोकस' वाढणार?
11
आता मिसाइल, दारूगोळा अन् शस्त्रास्त्र खासगी कंपन्या बनवणार; संरक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय
12
IND W vs PAK W Live Streaming: भारतीय 'रन'रागिणींचा दबदबा; पाक महिला संघ कधीच नाही जिंकला!
13
अरबी समुद्रात 'शक्ती' चक्रीवादळ घोंगावलं, हवामान खात्याचा इशारा; महाराष्ट्राला कितपत बसणार फटका?
14
...म्हणून अजित पवारांनी त्या गोष्टीचा फायदा उचलला; गृहराज्यमंत्री योगेश कदम : आदित्यला मंत्रिपद ही चूक
15
चालतंय तोवर चालवायचं असं तो वागला नाही; मग तुम्ही एवढी घाई का केली? कैफचा आगरकरांना सवाल
16
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना चौफेर यश, येणी वसूल-पैशांचा ओघ; बढती-नवी नोकरी, सरकारी लाभ!
17
दहा मुलांचे जीव गेल्यानंतर 'अ‍ॅक्शन'! विषारी कफ सिरप लिहून देणाऱ्या 'त्या' डॉक्टरला बेड्या 
18
महायुतीत संघर्ष पेटला! गणेश नाईकांचे 'ते' व्हिडिओ महाराष्ट्रात प्रदर्शित करू; शिंदेसेनेचा इशारा
19
पुढच्या वर्षी मेगा सरकारी नोकरभरती, एमपीएससी भरतीही रेंगाळणार नाही; फडणवीस यांची घोषणा
20
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'बॉम्ब'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार

भारतासोबत PoK-दहशतवादावर चर्चा करण्यास तयार..; पाकिस्तानची 'या' देशाला मदतीची विनंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 16:12 IST

India-Pakistan Relation : भारताशी दहशतवादाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी पाकिस्तान तयार झाला आहे.

India-Pakistan Relation : जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध विकोपाला गेले आहेत. भारताने सिंधू पाणी करार स्थगित केल्यामुळे पाकिस्तानात दुष्काळसदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. पाक सरकारने भारत सरकारसोबत संबंध सुधारण्याचे बरेच प्रयत्न केले, मात्र यापुढे दहशतवादाच्या मुद्द्यावरच चर्चा होणार, असा पवित्रा भारताने घेतला आहे. अशातच आता, पाकिस्तानातील शेहबाज सरकारने सौदी अरेबियाकडे मध्यस्थी करण्याची विनंती केली आहे.

सौदी अरेबियाकडे मागितील मदतमीडिया रिपोर्ट्सनुसार, पाकिस्तानी पंतप्रधान शाहबाज शरीफ हे भारताशी चर्चा करुन दहशतवाद, पाकव्याप्त काश्मीर आणि द्विपक्षीय व्यापाराचे प्रश्न सोडवू इच्छितात. यासाठी त्यांनी सौदी अरेबियाचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान अब्दुलअजीज अल सौद यांना मध्यस्थी करण्याची विनंती केली आहे. पाकिस्तानी वृत्तवाहिनी ARY न्यूजनुसार, शाहबाज शरीफ यांनी मोहम्मद बिन सलमान यांच्याशी फोनवर चर्चा केली, या दरम्यान त्यांनी POK, सिंधू पाणी करार, व्यापार आणि दहशतवाद यावर भारताशी बोलण्यास तयार असल्याचे सांगितले.

पाकिस्तानबाबत भारताची भूमिका२२ एप्रिल २०२५ रोजी झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध कठोर पावले उचलली होती, ज्यामध्ये पाकिस्तानी नागरिकांना हाकालून देणे, अटारी वाघा सीमा बंद करणे, पाकिस्तानींची व्हिसा सवलत थांबवणे, पाकिस्तान उच्चायोगातील कर्मचाऱ्यांची संख्या कमी करणे आणि सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजे, सिंधू पाणी करार स्थगित करणे. भारताची भूमिका स्पष्ट आहे की, जोपर्यंत पाकिस्तान दहशतवाद आणि POK चा प्रश्न सोडवत नाही, तोपर्यंत त्यांच्यासोबत इतर कोणत्याही मुद्द्यावर चर्चा केली जाणार नाही.

'तुमच्या मदतीची गरज नाही...', पुतिन यांनी काय ऑफर दिली? डोनाल्ड ट्रम्प यांचा स्पष्ट नकार

पाकिस्तानने भारतावर दबाव आणण्यासाठी ओआयसीमधील ५७ मुस्लिम देशांसमोर सिंधू पाणी कराराचा मुद्दा उपस्थित केला, मात्र त्यांचे सर्व प्रयत्न अपयशी ठरले. कोणत्याही देशाने पाकिस्तानच्या मागणीला गांभीर्याने घेतले नाही. अशा परिस्थितीत आता पाकिस्तानने सौदी अरेबियाकडे मदतीची याचना केली आहे. याव अद्याप भारत सरकारकडून कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाही. 

काय आहे सिंधू पाणी करार?६५ वर्षांपूर्वी १९६० मध्ये जागतिक बँकेच्या मध्यस्थीने भारत आणि पाकिस्तानमध्ये सिंधू नदीच्या पाण्याच्या वाटपावर एक करार झाला होता. या करारानुसार, पश्चिमेकडील नद्यांच्या - सिंधू, झेलम आणि चिनाबच्या पाण्यावर पाकिस्तानचा अधिकार आला, तर पूर्वेकडील नद्यांच्या - रावी, बियास आणि सतलजच्या पाण्यावर भारताचा अधिकार आहे. अशा प्रकारे, भारताला २० टक्के पाणी मिळाले, तर पाकिस्तानला ८० टक्के पाणी मिळाले. पाकिस्तानातील सुमारे साठ टक्के शेती याच सिंधू खोऱ्यातील पाण्यावर अवलंबुन आहे.

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाOperation Sindoorऑपरेशन सिंदूरIndiaभारतPakistanपाकिस्तानsaudi arabiaसौदी अरेबिया