India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 12:16 IST2025-06-18T12:15:03+5:302025-06-18T12:16:30+5:30

India-Pakistan News: २०२४ मध्ये भारताने अण्वस्त्र साठा वाढविला आहे.

India-Pakistan conflict News India has 10 more nuclear weapons than Pakistan | India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे

India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानसह जगातील जवळजवळ सर्व नऊ अण्वस्त्रसंपन्न देशांनी २०२४ मध्ये त्यांची अण्वस्त्र अपग्रेड करण्याची प्रक्रिया सुरू ठेवली शिवाय त्यांच्या शस्त्रांचा साठाही वाढवला. जागतिक थिंक टँक स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट (एसआयपीआरआय - सिप्रि)ने एका अहवालात ही माहिती दिली आहे.

सिप्रिने त्यांचा वार्षिक अहवाल ‘सिप्रि इअर बुक २०२५’ प्रसिद्ध केला आहे. यात जागतिक अण्वस्त्र परिस्थिती आणि शस्त्रास्त्र नियंत्रणावर गंभीर चिंता व्यक्त करण्यात आली आहे. अहवालानुसार, भारताने २०२४ मध्ये १७२ अण्वस्त्रांचा साठा केला होता. त्यात वाढ करून २०२५ मध्ये १८० अण्वस्त्रांपर्यंत वाढविला आहे. भारत केवळ आपल्या अण्वस्त्रांचा विस्तार करत नाही, तर कॅनिस्टराइज्ड क्षेपणास्त्रांसारख्या प्रगत वितरण प्रणालींवरही काम करत आहे. यामध्ये अग्नि-प्राइम क्षेपणास्त्र प्रणाली आणि मीर-व्ही (मल्टिपल इंडिपेंडेंटली टार्गेटेबल री-एंट्री व्हेईकल) सक्षम अग्नी-५ प्रणालीचा समावेश आहे.

नऊ देशांकडे तब्बल १२,२४१ अण्वस्त्र
स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूटने एका निवेदनात म्हटले आहे की, अमेरिका, रशिया, ब्रिटन, फ्रान्स, चीन, भारत, पाकिस्तान, डेमोक्रॅटिक पीपल्स रिपब्लिक ऑफ कोरिया (उत्तर कोरिया) आणि इस्रायल या जवळजवळ सर्व नऊ अण्वस्त्रसंपन्न देशांनी २०२४ मध्ये त्यांची अण्वस्त्रे अपग्रेड केली तसेच त्यांच्या शस्त्रांचा साठा वाढविला. जानेवारी २०२५ मध्ये जगभरातील अंदाजे १२,२४१ अण्वस्त्रांपैकी सुमारे ९,६१४ शस्त्रे संभाव्य वापरासाठी लष्करी साठ्यात होती.

चीन दरवर्षी १०० वॉरहेड्स जोडत आहे, २०३५ पर्यंत १५०० वॉरहेड्स जमवणार
चीन दरवर्षी सुमारे १०० वॉरहेड्स जोडत आहे. अहवालानुसार, २०३५ पर्यंत चीन १,५०० वॉरहेड्सपर्यंत पोहोचू शकतो. जागतिक स्तरावर १२,२४१ अण्वस्त्रांपैकी ९,६१४ लष्करी साठ्यात आहेत आणि सुमारे ३,९१२ ऑपरेशनल क्षेपणास्त्रे आणि विमानांवर तैनात आहेत, तर उर्वरित मध्यवर्ती साठवणुकीत ठेवण्यात आली आहेत. 

Web Title: India-Pakistan conflict News India has 10 more nuclear weapons than Pakistan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.