आम्ही पाम ऑइल खरेदी करणार; भारताच्या बंदीनंतर पाकचा मलेशियाला मदतीचा हात

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2020 04:32 PM2020-02-04T16:32:51+5:302020-02-04T16:37:15+5:30

काश्मीरमधून कलम 370 हटवण्याचा मुद्दा आणि नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून मलेशियाचे पंतप्रधान महातीर मोहम्मद यांनी भारताविरोधात आगपाखड करणं सुरूच ठेवलं आहे.

india malaysia palm oil dispute imran khan statement | आम्ही पाम ऑइल खरेदी करणार; भारताच्या बंदीनंतर पाकचा मलेशियाला मदतीचा हात

आम्ही पाम ऑइल खरेदी करणार; भारताच्या बंदीनंतर पाकचा मलेशियाला मदतीचा हात

Next
ठळक मुद्देभारतानंही मलेशियाकडून पाम ऑइल खरेदी करण्यावर बंदी घातली आहे. काश्मीरच्या मुद्द्यावरून पाकिस्तानच्या सुरात सूर मिसळणाऱ्या मलेशियाकडून आता पाकिस्तान पाम ऑइल खरेदी करणार आहे. आम्हाला शक्य होईल, तेवढं पाम ऑइल मलेशियाकडून खरेदी करू, असं इम्रान खान यांनी सांगितलं आहे.

क्वालालंपूर: काश्मीरमधून कलम 370 हटवण्याचा मुद्दा आणि नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून मलेशियाचे पंतप्रधान महातीर मोहम्मद यांनी भारताविरोधात आगपाखड करणं सुरूच ठेवलं आहे. त्यानंतर भारतानंही मलेशियाकडून पाम ऑइल खरेदी करण्यावर बंदी घातली आहे. काश्मीरच्या मुद्द्यावरून पाकिस्तानच्या सुरात सूर मिसळणाऱ्या मलेशियाकडून आता पाकिस्तान पाम ऑइल खरेदी करणार आहे. 
इम्रान खान सध्या मलेशियाच्या दौऱ्यावर असून, आम्हाला शक्य होईल, तेवढं पाम ऑइल मलेशियाकडून खरेदी करू, असं इम्रान खान यांनी सांगितलं आहे.

मलेशियाचे पंतप्रधान महातीर मोहम्मद यांच्यासोबत इम्रान खान यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली आहे. त्या परिषदेत त्यांनी भारताकडून होत असलेलं नुकसान भरून काढण्यासाठी आम्ही शक्य तेवढे प्रयत्न करू, असंही इम्रान खान म्हणाले आहेत. तसेच काश्मीरच्या मुद्द्यावर पाकिस्तानची बाजू घेणाऱ्या मलेशियाचे इम्रान खान यांनी आभार मानले आहेत. काश्मीर आणि नागरिकत्व सुधारणा कायद्यांसारख्या अंतर्गत प्रश्नात मलेशियाच्या पंतप्रधानांना ढवळाढवळ करण्याचा कोणताही अधिकार नाही. दुसरीकडे महातीर मोहम्मद यांनीही भारताच्या अंतर्गत विषयासंदर्भात बोलतच राहणार असल्याचं स्पष्ट केलेलं आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, मलेशियाहून आयात होणाऱ्या मायक्रो प्रोसेसर्स चिपवर भारतात तांत्रिक कारणास्तव बंदी घातली जाऊ शकते.  या चिपचा उपयोग दूरसंचार साधने तयार करण्यासाठी होतो. 

''कुठे काही चुकीचं होत असल्यास बोलावं लागेल''
भारतानं आमच्या आयातीवर घातलेल्या प्रतिबंधावर मी चिंतीत आहे. परंतु चुकीच्या गोष्टींसंदर्भात मी कायमच बोलत राहणार आहे. भारतानं आमच्या पाम ऑइलवर बंदी घातली आहे, त्यामुळेच आम्ही चिंतीत आहोत, कारण भारत आमचा बाजारातील मोठा ग्राहक आहे, परंतु आपल्याला या गोष्टींवर नजर ठेवावी लागणार आहे, असंही मलेशियाचे पंतप्रधान महातीर मोहम्मद यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच भारतानं आमच्या तेल आयातीवर बंदी घातल्यानं मलेशिया बाजारातही याचे परिणाम पाहायला मिळत आहेत.  
 

Web Title: india malaysia palm oil dispute imran khan statement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.