शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

मोठी बातमी! भारतानं कोरोना लशीचे 160 कोटी डोस केले बुक; 'या' कंपन्यांशी केला करार

By श्रीकृष्ण अंकुश | Published: December 04, 2020 10:24 AM

कोरोना व्हायरस लशीचे डोस बुक करण्याच्या बाबतीत भारत जगात पहिल्या क्रमांकावर आहे. तर भारतानंतर सर्वाधिक डोसची बुकिंग युरोपियन युनियन आणि अमेरिकेने केली आहे.

ठळक मुद्दे भारताने आतापर्यंत कोरोनाव्हायरस लाशीचे तब्बल 160 कोटी डोसची बुकिंग केली आहे. कोरोना व्हायरस लशीचे डोस बुक करण्याच्या बाबतीत भारत जगात पहिल्या क्रमांकावर आहे. 30 नोव्हेंबरपर्यंत यूरोपियन यूनियनने 158 कोटी तर अमेरिकेने 100 कोटीहून अधिक कोरोना लशींचे बुकिंग केले आहे.

नवी दिल्ली - कोरोना व्हायरस लशीचे डोस बुक करण्याच्या बाबतीत भारत जगात पहिल्या क्रमांकावर आहे. भारताने आतापर्यंत कोरोनाव्हायरस लाशीचे तब्बल 160 कोटी डोसची बुकिंग केली आहे. जगभरात लशीच्या बुकिंगसंदर्भात ड्यूक युनिव्हर्सिटीच्या अहवालाप्रमाणे भारतानंतर सर्वाधिक डोसची बुकिंग युरोपियन युनियन आणि अमेरिकेने केली आहे. 30 नोव्हेंबरपर्यंत यूरोपियन यूनियनने 158 कोटी तर अमेरिकेने 100 कोटीहून अधिक कोरोना लशींचे बुकिंग केले आहे. या लशी ट्रायलमध्ये यशस्वी ठरल्या तर वापराची मंजुरी मिळताच लसीकरणाला सुरुवात करण्यात येईल.

भारताने तीन कंपन्यांशी केलाय करार - जगभरात ऑक्‍सफर्ड एस्‍ट्राजेनेकाच्या लशीची मोठी मागणी आहे. अनेक देशांनी या लशीचे 150 कोटी डोस बुक केले आहेत. भारतात ऑक्सफर्डच्या लशीचे सीरम इंस्टिट्यूट आणि एस्ट्राजेनेकाकडून क्लिनिकल ट्रायल केले जात आहे. भारत आणि अमेरिकेने या लशीचे 50-50 कोटी डोस बुक केले आहेत. या शिवाय नोव्हावॅक्‍सच्या लशीचे 120 कोटी डोसदेखील बुक करण्यात आले आहेत. 

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन नोव्हेंबर महिन्यात म्हणाले होते, भारत जुलै-ऑगस्‍ट 2021पर्यंत 50 कोटी डोज मिळविण्यासाठी लस निर्माता कंपन्यांच्या संपर्कात आहे. ड्यूक युनिव्हर्सिटीच्या अहवालानुसार, भारताने रशियन कोरोना लस Sputnik V च्या 10 कोटी तर नोवाव्हॅक्‍सच्या लशीच्या 100 कोटी डोससाठी डील केली आहे.

भारत रशीयन लशीचे उत्पानही करणार -भारत रशियन कोरोना लस स्पुतनिक Vचेही वर्षाला 100 मिलियन डोस तयार करणार आहे. रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड (आरडीआयएफ) आणि हैदराबादची कंपनी हेटेरो बॉयोफार्मा यांच्यात करार झाला आहे. आरडीआयएफने म्हटले आहे, की 2021च्या सुरुवातीला या लशीचे उत्पादन सुरू करण्याचा त्यांचा मानस आहे. ही लस मानवी परीक्षणाच्या तिसऱ्या टप्प्यावर 91.4 टक्के प्रभावी ठरल्याचा दावा रशियन कोरोना लस स्पुतनिक V कडून करण्यात आला होता.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNarendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारतmedicineऔषधं