India Global Hub: जागतिक राजकारणात दररोज नवनवीन घडामोडी घडत आहेत. आता कुठल्याही देशाची पॉवर तेलाच्या साठ्यावर नाही, तर दुर्मिळ खनिजांवर ठरणार आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेने भारतासह 54 देशांच्या सहभागातून नवा आंतरराष्ट्रीय खनिज समूह स्थापन करण्याची घोषणा केली आहे.
या उपक्रमाचा मुख्य उद्देश दुर्मिळ पृथ्वी आणि अत्यावश्यक खनिजांच्या पुरवठ्यावर चीनची सुमारे 90 टक्क्यांची मक्तेदारी कमी करणे हा आहे. ही घोषणा वॉशिंग्टन येथे पार पडलेल्या 2026 क्रिटिकल मिनरल्स मिनिस्टीरियल बैठकीत करण्यात आली.
भारताची ठाम भूमिका
या बैठकीला अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो, उपराष्ट्राध्यक्ष जेडी वेंस आणि अर्थमंत्री स्कॉट बेसेन्ट उपस्थित होते. भारताच्या वतीने परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांच्या उपस्थितीमुळे, या नव्या खनिज आघाडीत भारत एक महत्त्वाचा केंद्रबिंदू ठरणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.
FORGE आणि Pax Silica: दोन नवे मंच
या उपक्रमांतर्गत दोन प्रमुख आंतरराष्ट्रीय मंचांची स्थापना करण्यात आली आहे.
FORGE (पूर्वीच्या Minerals Security Partnership च्या जागी): खनिजांच्या किंमती आणि पुरवठा साखळी सुरक्षित व स्थिर ठेवणे हा या मंचाचा उद्देश आहे. सध्या याचे नेतृत्व दक्षिण कोरियाकडे देण्यात आले आहे.
Pax Silica: सेमिकंडक्टर, आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आणि हाय-टेक उद्योगांसाठी आवश्यक खनिजांचा पुरवठा चीनऐवजी विश्वासार्ह देशांकडे वळवणे हा या मंचाचा केंद्रबिंदू आहे. या उपक्रमात भारताला एक मजबूत स्तंभ मानले जात आहे.
अमेरिकेकडून 30 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक
अमेरिकेने स्पष्ट केले आहे की, चीनच्या पर्याय म्हणून भारतासारख्या विश्वासार्ह भागीदार देशांमध्ये खनिज उत्खनन आणि रिफायनिंगसाठी सुमारे 30 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली जाईल. यामुळे भारतासाठी केवळ खनिजांचा ग्राहक न राहता, जागतिक स्तरावर खनिज प्रक्रिया व शुद्धीकरणाचे केंद्र (Global Refining Hub) बनण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे.
टॅरिफ कपात आणि Project Vault
या घोषणेपूर्वीच अमेरिकेने भारतीय उत्पादनांवरील आयात शुल्क 25 टक्क्यांवरून 18 टक्क्यांपर्यंत कमी केले आहे. यामुळे बॅटरी, इलेक्ट्रॉनिक्स आणि सेमिकंडक्टर संबंधित उत्पादनांच्या निर्यातीला मोठी चालना मिळण्याची शक्यता आहे. तसेच, अमेरिकेने Project Vault जाहीर केला असून, त्याअंतर्गत रणनीतिक खनिज साठा उभारला जाणार आहे, जेणेकरून आपत्कालीन परिस्थितीत उद्योगांचे उत्पादन थांबू नये.
Web Summary : US backs India to counter China's mineral dominance, investing $30B. India joins 54-nation group to secure critical mineral supply chains, becoming a global refining hub. Tariff cuts boost Indian exports.
Web Summary : अमेरिका ने चीन के खनिज वर्चस्व को कम करने के लिए भारत का समर्थन किया, 30 अरब डॉलर का निवेश। भारत महत्वपूर्ण खनिज आपूर्ति श्रृंखलाओं को सुरक्षित करने के लिए 54 देशों के समूह में शामिल हुआ, वैश्विक शोधन केंद्र बनेगा। टैरिफ में कटौती से भारतीय निर्यात को बढ़ावा।