भारताला मिळाली रशिया-ब्राझीलची साथ; चीनही पाठिंबा देणार, ट्रम्पविरोधात ब्रिक्स देशांची वज्रमुठ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 11:56 IST2025-08-07T11:56:28+5:302025-08-07T11:56:53+5:30

डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात ब्रिक्स देश एकत्र येत आहेत.

India gets support from Russia-Brazil; China will also support, BRICS countries' thunderbolt against Trump | भारताला मिळाली रशिया-ब्राझीलची साथ; चीनही पाठिंबा देणार, ट्रम्पविरोधात ब्रिक्स देशांची वज्रमुठ

भारताला मिळाली रशिया-ब्राझीलची साथ; चीनही पाठिंबा देणार, ट्रम्पविरोधात ब्रिक्स देशांची वज्रमुठ

Donald Trump: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासह जगभरातील अनेक देशांवर आयात शुल्क लावले आहे. कालच त्यांनी भारतावर अतिरिक्त २५% शुल्क लावण्याची घोषणा केली. यासह भारतावर एकूण ५०% शुल्क लावण्यात आले आहे. अमेरिकेच्या दबावापुढे भारत झुकेल, असे त्यांना वाटले, मात्र भारताने आता नवी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. भारतासाठी अमेरिका एक प्रमुख बाजारपेठ आहे, मात्र या अतिरिक्त शुल्कामुळे भारताने आता इतर पर्याय शोधण्यास सुरुवात केली आहे. 

टॅरिफ धोरणांमुळे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प स्वतः अडचणीत सापडल्याचे पाहायला मिळत आहे. भारतासोबतचे संबंध बिघडवल्याबद्दल त्यांच्यावर फक्त अमेरिकेतूनच नाही, इतर देशही टीका करत आहेत. अशातच, ट्रम्प यांनी भारतावर कर लावल्यानंतर भारताने चीनसोबतचे संबंध सुधारण्यास सुरुवात केली आहे. यासाठी पीएम मोदी स्वतः चीनच्या दौऱ्यावर जाणार आहेत. रशिया आधीपासूनच भारताच्या बाजूने उभा आहे, आता ब्राझीलदेखील भारताच्या बाजूने येतोय. हे चार देश एकत्र आले, तर अमेरिकेच्या वर्चस्वाला नक्कीच एक मोठा धक्का बसेल.

डोभाल यांचा मॉस्को दौरा
भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजित डोवाल बुधवारी रशिया दौऱ्यावर गेले. डोवाल द्विपक्षीय ऊर्जा आणि संरक्षण संबंध तसेच रशियन कच्च्या तेलावरील पाश्चात्य निर्बंधांवर रशियन अधिकाऱ्यांशी चर्चा करतील. डोवाल यांचा दौरा अशा वेळी होत आहे, जेव्हा पाश्चात्य देशांनी निर्बंध लादले असले तरी, भारत सातत्याने रशियाकडून कच्चे तेल खरेदी करुन अमेरिकेच्या वर्चस्वाला आव्हान देत आहेत. डोवाल यांच्या दौऱ्यापूर्वी रशियाचे उपसंरक्षणमंत्री कर्नल जनरल अलेक्झांडर फोमिन यांनी भारतीय राजदूत विनय कुमार यांची भेट घेतली होती. 

ब्राझीलचे अध्यक्ष पंतप्रधान मोदींशी चर्चा करणार
ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांनीही डोनाल्ड ट्रम्प धक्का दिला आहे. अध्यक्ष लुईझ इनासियो लुला दा सिल्वा यांनी ट्रम्प यांच्या टॅरिफवर म्हटले की, ब्राझील जागतिक व्यापार संघटनेसह (डब्ल्यूटीओ) सर्व उपलब्ध संसाधनांचा वापर करून त्यांचे हित जपेल. ते ट्रम्प यांना टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावणार नाहीत, कारण अमेरिकन नेते बोलू इच्छित नाहीत. परंतु ते चीनचे प्रमुख शी जिनपिंग आणि पंतप्रधान मोदींशी फोनवर चर्चा करणार आहेत. अशाप्रकारे ब्रिक्सचा भाग असलेले भारत, चीन, रशिया आणि ब्राझील अमेरिकेच्या वर्चस्वाला आव्हान देण्यासाठी एकत्र येत आहेत.

 

Web Title: India gets support from Russia-Brazil; China will also support, BRICS countries' thunderbolt against Trump

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.