भारताच्या सहअध्यक्षतेखाली पॅरिसमध्ये सर्वात मोठी एआय ॲक्शन समिट; AI चं ठरेल भवितव्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 08:43 IST2025-02-11T08:43:39+5:302025-02-11T08:43:59+5:30
अमेरिकेसोबत सुरक्षा करार होण्याची आशा

भारताच्या सहअध्यक्षतेखाली पॅरिसमध्ये सर्वात मोठी एआय ॲक्शन समिट; AI चं ठरेल भवितव्य
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी चार दिवसीय फ्रान्स आणि अमेरिका दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत. पंतप्रधानांच्या दौऱ्यात पॅरिसमध्ये एआय वापराबाबत रुपरेखा निश्चित होण्यासह सुरक्षा करार होण्याची आशा आहे. आपल्या सहाव्या फ्रान्स दौऱ्यात पंतप्रधान मोदी पॅरिसमध्ये एआय ॲक्शन समिट २५ मध्ये अध्यक्षपद भूषवणार असून, या परिषदेत १०० पेक्षा अधिक देशांनी भाग घेतला आहे. यात चीन आणि रशियाचाही समावेश आहे.
अमेरिका दौरा हा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात दोन्ही देशांमधील सहकार्यात मिळालेल्या यशांना बळकटी देण्याची संधी असेल. तंत्रज्ञान, व्यापार, संरक्षण, ऊर्जा आणि पुरवठा साखळीतील लवचीकता या क्षेत्रांसह अमेरिकेबरोबर भारताची भागीदारी अधिक विस्तारित आणि सखोल करण्यासाठी एक अजेंडा विकसित करण्यासदेखील यामुळे मदत होईल, मला विश्वास आहे की आमच्या चर्चा त्यावेळच्या चर्चेवर आधारित असतील’, असे पंतप्रधानांनी समाजमाध्यमांवर म्हटले आहे.
एआय ॲक्शन समिटसाठी उत्सुक
मॅक्रॉन यांच्या निमंत्रणावरून मोदी फ्रान्सला जात आहेत. पंतप्रधान म्हणाले की, ‘एआय ॲक्शन समिट’चे सह-अध्यक्षपद भूषवण्यास ते उत्सुक आहेत. मॅक्रॉन यांच्याबरोबर धोरणात्मक भागीदारीसाठी प्रगतीचा आढावा घेण्याची संधी मिळेल
शहीद भारतीय सैनिकांना श्रद्धांजली
महायुद्धात बलिदान देणाऱ्या भारतीय सैनिकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पंतप्रधान ‘मझारग्यूज वॉर सिमेटरी’लाही भेट देतील.
आम्ही दोन्ही देशांच्या लोकांच्या परस्पर हितासाठी एकत्र काम करू आणि जगासाठी एक चांगले भविष्य घडवू. मी माझे मित्र ट्रम्प यांना भेटण्यास उत्सुक आहे. - नरेंद्र मोदी, पंतप्रधान