India China FaceOff Japan Extends Its Defense Intelligence Sharing With Indian Forces | India China FaceOff: शत्रूचा शत्रू तो आपला मित्र! आणखी एक देश भारतासोबत येणार; लवकरच 'गुप्त करार' करणार

India China FaceOff: शत्रूचा शत्रू तो आपला मित्र! आणखी एक देश भारतासोबत येणार; लवकरच 'गुप्त करार' करणार

नवी दिल्ली: चीनच्या विस्तारवादी धोरणाचा सामना करणारा आणखी एक देश भारतासोबत येणार आहे. त्यामुळे चीनविरुद्धची आघाडी आणखी मजबूत झाली आहे. चीनकडून असलेला धोका लक्षात घेता जपाननं गुप्त कायद्याची व्याप्ती वाढवण्याचा विचार सुरू केला आहे. त्यामुळे जपानकडून भारत, ऑस्ट्रेलिया आणि ब्रिटनला चीनच्या लष्करी हालचालींची आणि कारवायांची गुप्त माहिती मिळेल. गेल्याच महिन्यात जपाननं गुप्त कायद्यात बदल करत भारत, ऑस्ट्रेलिया आणि ब्रिटनला विशेष दर्जा दिला आहे.

राष्ट्रीय गुप्त कायद्याच्या अंतर्गत जपान त्यांच्या सुरक्षेला धोका पोहोचवणारी माहिती फोडणाऱ्या व्यक्तीला दंड आणि १० वर्षे तुरुंगवासाची शिक्षा ठोठावतो. गेल्या काही वर्षांपासून चीननं पूर्व चिनी समुद्रात जपानची डोकेदुखी वाढवली आहे. या भागात चिनी नौदल मोठ्या संख्येनं तैनात आहे. चिनी नौदलाकडून सातत्यानं कुरघोड्या सुरू असल्यानं जपानच्या अडचणी वाढल्या आहेत. हा धोका पाहता जपाननं गुप्त कायद्याची व्याप्ती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. याआधी जपान केवळ अमेरिकेसोबत गुप्त माहितीची देवाणघेवाण करायचा. मात्र आता त्यात भारतासह आणखी दोन देशांचा समावेश झाला आहे.

जपाननं उचललेल्या पावलाचा मोठा फायदा भारतासह ऑस्ट्रेलिया आणि ब्रिटनला होईल. यामुळे तिन्ही देश जपानी सैन्यासोबत लष्करी सराव करू शकतील. चिनी सैन्याच्या हालचालींची माहितीदेखील जपानकडून भारताला मिळेल. पूर्व चिनी सुमद्रातील चीनच्या हालचालींचा संपूर्ण तपशील भारताला जपानकडून उपलब्ध करून देण्यात येईल. यासाठी जपान सरकार कायद्यात बदल करणार आहे. त्यानंतर भारतासह ब्रिटन, ऑस्ट्रेलिया आणि फ्रान्ससोबत करार केले जातील. करार करणारे देश त्यांची संरक्षणविषयक माहिती गुप्त ठेवतील. त्यामुळे एकमेकांची गुप्त माहिती फुटण्याची शक्यता कमी होईल.

विस्तारवादाचा काळ संपला; भारतीय सीमेवरून पंतप्रधान मोदी यांनी चीनला दिला सज्जड इशारा

मोदींच्या 'त्या' एका वक्तव्याने चीनचा 'जळफळाट'; पंतप्रधानांच्या भाषणावर अशी आली 'पहिली' प्रतिक्रिया

Read in English

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: India China FaceOff Japan Extends Its Defense Intelligence Sharing With Indian Forces

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.