India-China Faceoff: जगात भारताशिवाय दुसरा कोणताच देश चीनला टक्कर देऊ शकत नाही; जर्मनीने केले PM मोदींचे कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2022 03:30 PM2022-12-15T15:30:30+5:302022-12-15T15:31:52+5:30

India-China Faceoff: भारत आणि चीन संघर्षाबाबत जर्मनीकडून प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली असून, मोदी सरकारचे कौतुक केले आहे.

india china faceoff german envoy said only india can cope china after tawang india china clash | India-China Faceoff: जगात भारताशिवाय दुसरा कोणताच देश चीनला टक्कर देऊ शकत नाही; जर्मनीने केले PM मोदींचे कौतुक

India-China Faceoff: जगात भारताशिवाय दुसरा कोणताच देश चीनला टक्कर देऊ शकत नाही; जर्मनीने केले PM मोदींचे कौतुक

Next

India-China Faceoff: काही दिवसांपूर्वी अरुणाचल प्रदेश येथील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये जोरदार झटापट झाली. यामध्ये दोन्ही देशांचे सैनिक जखमी झाल्याचे सांगितले जात आहे. यानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी संसदेत याबाबतची सविस्तर स्पष्टीकरण दिले. यातच आता जर्मनीकडून भारताचे कौतुक करण्यात आले आहे. जगात भारताशिवाय दुसरा कोणताही देश नाही, जो चीनला टक्कर देऊ शकेल, असे जर्मनीने म्हटले आहे. 

जर्मनीचे राजदूत फिलीप एकरमॅन यांनी एका मुलाखतीत बोलताना अरुणाचलच्या तवांग सेक्टरमध्ये भारत व चीनच्या सैनिकांत गत काही दिवसांत झालेल्या झटापटीचा मुद्द्यावर भाष्य करताना, हा चिंतेचा विषय आहे. तसेच आंतरराष्ट्रीय सीमांच्या नियमांचे कुणीही उल्लंघन करता कामा नये, असे म्हटले आहे. तसेच विकासाच्या बाबतीत भारताशिवाय दुसरा कोणताही देश चीनशी स्पर्धा करू शकत नाही, असेही फिलीप यांनी नमूद केले. 

जगात भारताशिवाय दुसरा कोणताच देश चीनला टक्कर देऊ शकत नाही

भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये झडप झाली, याबाबत सविस्तर माहिती आमच्याकडे नाही. मात्र, मीडियात येणाऱ्या वृत्तांनुसार पाहिल्यास, हा चिंतेचा विषय आहे. युरोपीय देशांबाबत बोलायचे झाल्यास रशिया आणि युक्रेन युद्धाचा प्रचंड परिणाम पाहायला मिळत आहे. जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. शरणार्थी असो, किमती असो वा अन्य कोणत्याही गोष्टी असो, सर्व गोष्टींवर प्रभाव आहे. आर्थिक आघाडीवरही याचा परिणाम दिसत आहे. मात्र, विकास, लोकसंख्या आणि इतर बाबींमध्ये भारताशिवाय दुसरा कोणताही देश चीनला टक्कर देऊ शकत नाही, असेही ते म्हणाले. याशिवाय एटीएफचा करार झाला पाहिजे. कारण यामुळे जर्मनी आणि भारतामधील व्यवसायिक संबंधात अभूतपूर्व बदल दिसू शकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, आताच्या घडीला जर्मनी चीनवर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. अन्य देशांशी जर्मनीला व्यापार वाढवावा लागणार आहे. मात्र, भारताकडून आम्हाला अपेक्षित प्राधान्य मिळताना दिसत नाही, अशी खंत फिलीप यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली. दुसरीकडे, अमेरिकेनेही भारत चीन संघर्षावर प्रतिक्रिया दिली आहे. चीन चिथावणी देणाऱ्या रणनीतिचा अवलंब करत आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर चीनकडून होत असलेल्या बहुतांश हालचालींवर आमचे बारीक लक्ष असल्याचा सूचक इशाराही अमेरिकेने दिला आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: india china faceoff german envoy said only india can cope china after tawang india china clash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.