शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

India China Faceoff भारतीय जवानांचे चोख प्रत्युत्तर; झटापटीत चीनचे पाच सैनिक ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2020 15:37 IST

दोन्ही देशांदरम्यान जवळपास पाच दशकांनंतर एवढी गंभीर घटना घडली असून लष्करप्रमुख एमएम नरवणे यांनी पठाणकोट लष्करी तळाला भेट देण्याचा दौरा रद्द केला आहे.

नवी दिल्ली : लडाखमधील भारत-चीन सीमेवर सोमवारी रात्री झालेल्या दोन्ही सैन्यांच्या झटापटीमध्ये एका अधिकाऱ्यासह तीन भारतीय जवान शहीद झाले होते. मात्र, चीनच्या सैन्याला भारतीय जवानांनी चोख प्रत्यूत्तर दिले असून चीनचेही पाच जवान ठार झाले आहेत. 

दोन्ही देशांदरम्यान जवळपास पाच दशकांनंतर एवढी गंभीर घटना घडली असून लष्करप्रमुख एमएम नरवणे यांनी पठाणकोट लष्करी तळाला भेट देण्याचा दौरा रद्द केला आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सकाळीच परराष्ट्र मंत्री जयशंकर आणि लष्करप्रमुख नरवणे यांची बैठक बोलावली होती. सीमेवरील तणाव निवळण्यासाठी दोन्ही देशांचे लष्करी अधिकार प्रयत्न करत आहेत. यावर चीनने भारतावर गंभीर आरोप केले असून भारतीय सैनिकांनीच दोनदा चीनची हद्द ओलांडल्याचा दावा केला आहे. तसेच भारतीय सैनिकांनीच आधी चीनच्या सैनिकांना आक्रमणासाठी चिथावणी दिल्याचे म्हटले आहे. 

दरम्यान, भारतीय सैन्याने तीन जवान शहीद झाल्याची माहिती दिली. यानंतर चीनलाही जबर नुकसान सोसावे लागले असल्याचे म्हटले होते. आता चीनच्या बाजुने भारतीय जवानांसोबतच्या झटापटीत ठार झालेल्या सैनिकांचा आकडा जाहीर करण्यात आला असून चीनचे 5 जवान ठार झाले आहेत. 

भारतासोबतच्या लढायांमध्ये चीनलाच मोठे नुकसानभारत आणि चीनमध्ये शेवटचा गोळीबार 1967 मध्ये झाला होता. म्हणजे 53 वर्षांपूर्वी. ही हिंसा सिक्किममध्ये झाली होती. चीन अशासाठी चिडला होता कारण भारत आपल्या क्षेत्रामध्ये 1962 च्या युद्धानंतर सैन्यासाठी तयारी करत होता. 1967 च्या छोट्या युद्धामध्ये भारताचे 80 जवान शहीद झाले होते तर चीनचे 400 सैनिक ठार झाले होते. 

कोरोना व्हायरसमुळे जगभरात टीका आणि विरोधाचा सामना करावा लागत असल्याने चीन तणावात आहे. यामुळे चीनमधील उत्पादनांची मागणीही घटलेली आहे. यामुळे चीनच्या लोकांचा विरोधही सहन करावा लागत असल्याने राष्ट्रवादाची लाट आणण्यासाठी आणि लोकांना त्यात गुंतवून ठेवण्यासाठी चीन भारत आणि तैवानसोबत तणाव वाढवू लागला आहे. यामुळे चीनने भारताच्या लडाखमध्ये घुसखोरी केली आहे. यावरून गेल्या दोन महिन्यांपासून वाद सुरु आहे. एकदा दोन्ही सैन्यादरम्यान दगडफेकही झाली आहे. 

अन्य महत्वाच्या बातम्या...

India China Faceoff चीनच्या उलट्या बोंबा; भारतीय सैन्यानंच आधी आक्रमण केल्याचा आरोप

Galwan Valley 1967 नंतर पहिल्यांदाच भारत-चीन सीमेवर जवान शहीद

Big Breaking भारत-चीन सीमेवर हिंसक चकमक, एका अधिकाऱ्यासह तीन जवान शहीद

संयुक्त महाराष्ट्रासाठी लढलेले ज्येष्ठ पत्रकार दिनू रणदिवे यांचं निधन

EPFO ची जबरदस्त सेवा सुरु; देशभरात कोणत्याही क्षेत्रिय कार्यालयात करता येणार क्लेम

खाट का कुरकुरतेय? विधान परिषदेवरून शिवसेनेचा काँग्रेसवर निशाणा

TikTok ची कंपनी भारतातून गाशा गुंडाळण्याच्या तयारीत?; व्हिडीओ अ‍ॅप बंद करणार

"सुशांत कसा आहे?" मृत्यू सहन होईना; वहिनीने सोडला प्राण

टॅग्स :chinaचीनladakhलडाखIndian Armyभारतीय जवान