शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
2
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
3
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
4
नोकरी गमावल्यानंतर तुमचे गृहकर्ज, गाडीचा हप्ता भरला जाईल! काय आहे जॉब लॉस इन्शुरन्स? कसा मिळवायचा?
5
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत होते मंत्री, तेवढ्यात धडाधड कोसळलं छत, त्यानंतर...  
6
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
7
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
8
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
9
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
10
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
11
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
12
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
13
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
14
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
15
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
16
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
17
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
18
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
19
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन

India China FaceOff: 'ती' सीमादेखील वादग्रस्त असल्याचा ड्रॅगनचा दावा; भारताविरोधात नवा कावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2020 16:08 IST

आणखी एका देशाला जाळ्यात ओढण्याचा ड्रॅगनचा प्रयत्न; भारताविरोधात मोठी रणनीती

बीजिंग: पूर्व लडाखमध्ये तणाव वाढवणारा चीन भारताविरोधात मोठी रणनीती आखताना दिसत आहे. नेपाळला अप्रत्यक्षपणे पाठिंबा देत भारताविरोधात भडकावल्यानंतर आता चीन नवी चाल खेळण्याच्या प्रयत्नात आहे. भूतानसोबत पूर्व भागात सीमावाद असल्याची कबुली पहिल्यांदाच अधिकृतपणे चीनकडून देण्यात आली आहे. चीननं दिलेली कबुली भारतासाठी महत्त्वाची आहे.भूतानची पूर्वेकडील सीमा अरुणाचल प्रदेशला लागून आहे. याच भागात सीमावाद असल्याचा दावा चीननं केला आहे. भूतानसोबतचा सीमावाद कधीच संपुष्टात आला नव्हता, अशी भूमिका चीननं घेतली आहे. 'पूर्व, मध्य आणि पश्चिमेकडील भागांत भुतानसोबत बऱ्याच कालावधीपासून सीमावाद सुरू झाला. यामध्ये कोणत्याही तिसऱ्या देशानं हस्तक्षेप करू नये,' असं म्हणत चीननं अप्रत्यक्षपणे भारताला इशारा दिला आहे. 'हिंदुस्तान टाईम्स'नं याबद्दलचं वृत्त दिलं आहे.भूतानसोबत १९८४ ते २०१६ या कालावधीत आतापर्यंत २४ वेळा बैठका झाल्या. त्यात केवळ पश्चिम आणि मध्य क्षेत्रातील वादावर चर्चा झाल्याचा चीनचा दावा आहे. चीनसोबत याआधी कधीही पूर्व भागात सीमावादावर चर्चा झाली नसल्याची माहिती भूतानमधील सूत्रांनी दिली. 'दोन्ही देशांनी मध्य आणि पश्चिमेकडील सीमावाद मान्य केला होता. हा वाद सोडवण्यासाठी सहमतीदेखील झाली होती. चीनला पूर्वेतील जमीनदेखील त्यांची वाटत होती, तर मग त्यांनी हा विषय आधीच उपस्थित करायला हवा होता,' असा मुद्दा भूतानकडून मांडला जात आहे.पूर्वेकडील सीमावाद उकरून काढणं हा चीनचा नवा डाव असल्याचं भूतानमधील तज्ज्ञांनी सांगितलं. 'दोन्ही देशांनी सीमावादाबद्दलच्या कागदपत्रांवर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. त्यात केवळ पश्चिम आणि मध्य भागातील सीमांचा उल्लेख आहे,' अशी माहिती तज्ज्ञांनी दिली. चीनच्या या नव्या दाव्यावर भारतानं अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. शत्रूचा शत्रू तो आपला मित्र! आणखी एक देश भारतासोबत येणार; लवकरच 'गुप्त करार' करणारआणखी एक दणका! आता मेट्रो प्रकल्पातून 'चिनी कम'; ड्रॅगनला जोरदार धक्कावाढत्या एकीनं चीन एकाकी; भारताला 'या' पाच बलाढ्य देशांचा पाठिंबा

टॅग्स :india china faceoffभारत-चीन तणावNepalनेपाळBhutanभूतान