India-China:चीनने पुन्हा एकदा भडकाऊ विधान करत अरुणाचल प्रदेशवर आपल्या दाव्याचा पुनरुच्चार केला आहे. शांघाय विमानतळावर भारतीय महिलेचा मानसिक छळ केल्याच्या आरोपांवर चीनने प्रतिक्रिया देताना, त्यांना पूर्णतः चुकीचे म्हटले आणि सर्व प्रक्रिया नियमांनुसार झाल्याचा दावा केला.
भारतीय महिलेचा छळ
ब्रिटनमध्ये राहणाऱ्या भारतीय नागरिक पेमा वांगजोम थोंगडोक 21 नोव्हेंबर रोजी लंडनहून जपानला जात होत्या. आपल्या प्रवासादरम्यान, शांघाय विमानतळावर अडवल्याचा आरोप त्यांनी सोशल मीडियावर केला आहे. थोंगडोक यांनी सांगितले की, त्यांच्या पासपोर्टवर जन्मस्थान Arunachal Pradesh (भारत) लिहिले असल्यामुळे चीनी अधिकाऱ्यांनी पासपोर्ट अवैध ठरवून त्यांना तब्बल 18 तास रोखून ठेवले.
चीनने काय म्हटले?
या प्रकरणावर चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या माओ निंग यांनी या आरोपांचे खंडन केले. त्या म्हणाल्या की, या महिलेवर कोणतीही बळजबरी, अटक किंवा छळ करण्यात आला नाही. चीनच्या सीमा निरीक्षण अधिकाऱ्यांनी सर्व प्रक्रिया कायद्याप्रमाणेच केली आहे. एअरलाइनने तिची योग्य व्यवस्था केली होती. यासोबतच माओ निंग यांनी अरुणाचल प्रदेश चीनचा भाग असल्याचा दावा केला. जंगनान (दक्षिण तिब्बत) हा चीनचा भाग आहे. भारताने ज्या तथाकथित अरुणाचल प्रदेशची निर्मिती केली, त्याला चीन कधीच मान्यता देत नाही, असे त्या म्हणाल्या.
भारताचा तीव्र निषेध
दिल्लीतील सरकारी सूत्रांच्या माहितीनुसार, भारताने घटनेच्या दिवशीच बीजिंग व नवी दिल्लीमधील चीनी अधिकाऱ्यांकडे कठोर निषेध नोंदवला. भारताने स्पष्ट सांगितले की, अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग आहे. अरुणाचलमधील नागरिकांना भारतीय पासपोर्ट वापरुन प्रवास करण्याचा पूर्ण अधिकार आहे. दरम्यान, या गोंधळानंतर शांघायमधील भारतीय वाणिज्य दूतावासानेही तत्काळ हस्तक्षेप करुन पेमा वांगजोम थोंगडोक यांची मदत केली व त्यांना रात्री उशिराच्या उड्डाणाने रवाना करण्यात आले.
अरुणाचलचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांची प्रतिक्रिया
मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला. त्यांनी ही घटना आंतरराष्ट्रीय मानकांचे उल्लंघन आणि भारतीय नागरिकांच्या प्रतिष्ठेवर आघात असल्याचे म्हटले. दरम्यान, चीनने पुन्हा एकदा अरुणाचलवर दावा केल्याने सीमावाद उफाळण्याची शक्यता आहे.
Web Summary : China reiterated its claim over Arunachal Pradesh, calling it Zangnan. This follows allegations of harassment of an Indian woman at Shanghai airport due to her passport stating birth in Arunachal. China denies wrongdoing, asserting adherence to regulations.
Web Summary : चीन ने अरुणाचल प्रदेश पर अपना दावा दोहराते हुए इसे जंगनान बताया। यह शंघाई हवाई अड्डे पर एक भारतीय महिला को अरुणाचल में जन्म के कारण पासपोर्ट पर उत्पीड़न के आरोपों के बाद आया है। चीन ने गलत काम से इनकार किया, और नियमों का पालन करने का दावा किया।