शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
2
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
3
सलवार सूट घातला, त्यावर बुरखा चढवला अन् महिला डॉक्टरच्या घरात घुसून ७ वेळा चाकूने वार केला; नेमकं प्रकरण काय?
4
अरे ही कसली आई! १५ महिन्यांच्या लेकाला बस स्टँडवर सोडलं अन् इन्स्टा बॉयफ्रेंडसोबत पळाली
5
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
6
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
7
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश
8
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
9
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
10
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
11
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
12
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
13
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
14
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
15
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
16
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
17
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
18
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
19
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
20
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप

"भारत थांबवू शकतो रशिया-युक्रेन युद्ध", इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांचे मोठे वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2024 12:26 IST

Italian PM Giorgia Meloni : इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी शनिवारी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांची भेट घेतल्यानंतर हे वक्तव्य केले आहे.

लंडन : गेल्या महिन्यांपासून रशिया आणि युक्रेन यांच्यात सध्या युद्ध सुरु आहे. युद्धादरम्यान इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी मोठे वक्तव्य केले आहे. रशिया-युक्रेन युद्ध संपवण्यासाठी जॉर्जिया मेलोनी यांनी भारताच्या भूमिकेवर जोर दिला आहे. शनिवारी एका वक्तव्यादरम्यान त्यांनी रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्यात भारत आणि चीनच्या महत्त्वाच्या भूमिकेबद्दल सांगितले. 

इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी शनिवारी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांची भेट घेतल्यानंतर हे वक्तव्य केले आहे. रशिया आणि युक्रेनमधील संघर्ष सोडवण्यासाठी भारत आणि चीन भूमिका बजावू शकतात, असे जॉर्जिया मेलोनी यांनी शनिवारी सांगितले. एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांची भेट घेतल्यानंतर एका परिषदेच्यावेळी जॉर्जिया मेलोनी म्हणाल्या, "संघर्षाच्या निराकरणात चीन आणि भारताची भूमिका असली पाहिजे, असे माझे म्हणणे आहे. तसेच, युक्रेनला एकटे टाकून हा संघर्ष सोडवला जाऊ शकतो, असा विचार करणेच शक्य नाही.'' 

दरम्यान, रशिया आणि युक्रेन युद्धादरम्यान रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे गुरुवारी मोठे वक्तव्य समोर आले होते. रशियाच्या युक्रेनसोबतच्या संभाव्य शांतता चर्चेत भारत, चीन आणि ब्राझील मध्यस्थाची भूमिका बजावू शकतात. युक्रेन संघर्ष आणि समस्या सोडवण्यासाठी ते प्रामाणिक प्रयत्न करत असल्याचे व्लादिमीर पुतिन यांनी म्हटले होते. अशातच आता इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांचे हे वक्तव्य समोर आले आहे.

भारत महत्त्वाची भूमिका बजावू शकतोरशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे हे वक्तव्य भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या युक्रेन आणि रशिया दौऱ्यानंतर आले आहे. नरेंद्र मोदींच्या युक्रेन आणि रशिया दौऱ्यांची बरीच चर्चा झाली होती. नरेंद्र मोदींचा हा दौरा महत्त्वाचा असल्याचे बोलले जात आहे. जगभरात या भेटीची चर्चा झाली. नरेंद्र मोदींनी दोन्ही देशांना भेटी देऊन आपल्या भूमिकेवर ठाम राहून शांततेने चर्चा करुन मार्ग काढावा असे म्हटले होते. दरम्यान, हे युद्ध थांबवण्यात भारत महत्त्वाची भूमिका बजावू शकतो, असे युक्रेनसह जगातील अनेक देशांनी म्हटले आहे. आता रशियाही तेच सांगत आहे. 

टॅग्स :IndiaभारतrussiaरशियाRussia Ukrainयुक्रेन आणि रशियाNarendra Modiनरेंद्र मोदीVladimir Putinव्लादिमीर पुतिनItalyइटली