शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
3
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
4
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
5
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
6
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
7
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
8
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
9
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
10
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
11
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
12
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
13
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
14
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
15
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
16
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
17
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...
18
राहुल गांधींचे आव्हान भाजपने स्वीकारले; खुल्या चर्चेसाठी 'या' नेत्याची केली निवड...
19
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
20
RR ला मोठा धक्का; स्टार खेळाडूची IPL 2024 मधून माघार, Play Off ची जागा पक्की होण्यापूर्वी झटका

भारत खरोखरच भाग्यवान देश; त्यांच्याकडे Serum Institute सारखी संस्था आहे; World Bank अध्यक्षांकडून गौरव

By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2021 11:44 AM

Corona Vaccine : सीरम इन्स्टीट्यूट ऑफ इंडियानं कोरोना काळात अनेक देशांना लसींचा पुरवठा करून केली होती मोठी मदत

ठळक मुद्देसीरम इन्स्टीट्यूट ऑफ इंडियानं कोरोना काळात अनेक देशांना लसींचा पुरवठा करून केली होती मोठी मदतWorld Bank अध्यक्षांकडून गौरव

कोरोनाच्या महासाथीदरम्यान अनेक देश कोरोना प्रतिबंधात्मक लसी विकसित करण्याचे प्रयत्न करत होते. भारतही यात अग्रस्थानी होता. दरम्यान, भारतात सध्या मोठ्या प्रमाणात लसीकरणालाही सुरूवात करण्यात आली आहे. यामध्ये सीरम इन्स्टीट्यूट ऑफ इंडिया आणि भारत बायोटेक या कंपन्यांच्या लसींचा समावेश आहे. दरम्यान, सीरम इन्स्टीट्यूट ऑफ इंडियानं कोरोनाच्या कालावधीत अनेक देशांना लसींचा पुरवठा केला. तसंच या कालावधीत भारतातही लसींचा पुरवठा सुरू होता. दरम्यान, जागतिक बँकेचे अध्यक्ष डेव्हिड मालपास यांनी सीरम इन्स्टीट्यूटसारखी जागतिक लस उत्पादन करणारी संस्था भारताकडे असल्याचं सांगत यासाठी भारत खरंच भाग्यवान आहे असं म्हणत गौरव केला. तसंच देशांतर्गत लसीकरणाचा वेगही वाढवण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांमुळे आपण प्रोत्साहित होत असल्याचं ते म्हणाले. आयएमएफ आणि जागतिक बँकेच्या आगामी बैठकीपूर्वी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी यावर भाष्य केलं.

"माझा सीरम इंन्स्टीट्यूट ऑफ इंडियासोबत अनेकदा संपर्क राहिला आहे. देशात जागतिक लस उत्पादन करणारी संस्था आहे हे भारताचं भाग्य आहे," असं डेव्हिड मालपास म्हणाले. "त्यांनी स्थानिक गरज पूर्ण करण्यासाठी देशात आणि जगातील इतर देशांना मदत करण्याच्या उद्देशानं अधिक पारदर्शकता आणली आहे. अमेरिका किंवा युरोपमध्ये, तसंच दक्षिण आफ्रिकेत किंवा भारतात तेथील मागणी पूर्ण करण्यासाठी स्थानिक उत्पादनाच्या काय गरजा आहेत हे स्पष्ट झालं नाही," असं ते एका प्रश्नाचं उत्तर देताना म्हणाले. भारतानं देशांतर्गत लसीकरण कार्यक्रमाचाही वेग वाढवला असल्यानं मी आनंदीत आहे आणि आम्ही यावर त्यांच्यासोबत काम करत आहोत, असंही त्यांनी नमूद केलं. लसीकरण मोहिमेसाठी अनेक लोकांची गरज"आपल्याला क्षमतेची मर्यादा खूप जास्त आहे. यासाठी लसीकरण मोहीम जे चालवत आहेत त्याचं प्रमाण वाढवण्यासाठी अनेक लोकांची गरज भासते," असंही मालपास म्हणाले. देशात शुक्रवारपर्यंत एकूण ७,०६,१८,०२६ लोकांचं लसीकरण करण्यात आल्याची माहिती आरोग्य मंत्रालयानं दिली होती. लसीकरणाच्या प्रक्रियेला मोठा कालावधी लागतो. त्यामुळे विकसनशील देशांमध्ये लवकरात लवकर लसींचा पुरवठा झाला पाहिजे ही महत्त्वाची बाब असल्याचंही त्यांनी नमूद केलं.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतWorld Bankवर्ल्ड बँक