ओमानचा ऐतिहासिक निर्णय; ७ लाख भारतीयांवर थेट परिणाम होणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2025 13:26 IST2025-06-28T13:25:48+5:302025-06-28T13:26:05+5:30

ओमानमध्ये लवकरच एक नवीन नियम लागू होणार आहे, ज्याचा परिणाम तेथे राहणाऱ्या भारतीयांवर होईल.

Income tax implemented in Oman Direct impact on 7 lakh Indians | ओमानचा ऐतिहासिक निर्णय; ७ लाख भारतीयांवर थेट परिणाम होणार!

ओमानचा ऐतिहासिक निर्णय; ७ लाख भारतीयांवर थेट परिणाम होणार!

ओमानमध्ये लवकरच एक नवीन नियम लागू होणार आहे, ज्याचा परिणाम तेथे राहणाऱ्या भारतीयांवर होईल. विशेष म्हणजे, ओमान हे आखाती देशांमधील पहिले राष्ट्र बनणार आहे, जे वैयक्तिक आयकर (Personal Income Tax) लागू करेल. ओमानमध्ये सुमारे ७ लाख भारतीय राहतात. हा नियम काय आहे आणि त्याचा किती भारतीयांवर परिणाम होईल हे जाणून घेऊया.

ओमानमध्ये वैयक्तिक आयकर: भारतीयांवर काय परिणाम?
ओमानने अधिकृतपणे २०२५चा रॉयल डिक्री क्रमांक ५६ जारी केला आहे, ज्याद्वारे वैयक्तिक आयकर प्रणालीची स्थापना करण्यात आली आहे. हा नियम २०२८च्या सुरुवातीपासून लागू होईल. या नियमानुसार, केवळ उच्च उत्पन्न असलेल्या व्यक्तींनाच कर भरावा लागणार आहे.

कोणाला भरावा लागेल कर?
हा नियम जानेवारी २०२८ पासून ओमानमध्ये लागू होईल. या नियमांतर्गत, दरवर्षी ४२,००० ओमानी रियाल (९३,३६, ९१० भारतीय रुपये) पेक्षा जास्त कमाई करणाऱ्या व्यक्तींवर ५% कर लावला जाईल. मात्र, ओमानच्या लोकसंख्येच्या उत्पन्नानुसार, केवळ १% लोकांवरच याचा परिणाम होईल, कारण फक्त १% लोकच इतके उत्पन्न कमावतात.

भारतीयांवर काय परिणाम होईल?
आखाती देशांमध्ये वैयक्तिक आयकर योजना आणणारा आणि ती लागू करण्याची तयारी करणारा ओमान हा पहिला देश ठरला आहे. यापूर्वी कोणत्याही आखाती देशात आयकर लागत नव्हता. त्यामुळे, आखाती देशांमध्ये काम करणाऱ्या मोठ्या संख्येने भारतीयांना आयकर भरावा लागत नव्हता. परंतु आता या नियमामुळे ४२,००० ओमानी रियाल कमावणाऱ्या भारतीयांनाही कर भरावा लागेल.

ओमानने हा निर्णय का घेतला?
ओमानने हा निर्णय का घेतला, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे ओमानला तेलावरील आपली निर्भरता कमी करायची आहे. याच कारणामुळे त्यांनी हे पाऊल उचलले आहे. वैयक्तिक आयकर प्रकल्पाचे संचालक करीमा मुबारक अल सादी यांनी ओमानी वृत्तसंस्थेला सांगितले की, "कर लागू करण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व तयारी आणि गोष्टी पूर्ण झाल्या आहेत. ओमान सरकार नवीन कर प्रणालीमध्ये बदल घडवून आणण्यासाठी सज्ज आहे."

हा कायदा सामाजिक संवेदनशीलता लक्षात घेऊन तयार करण्यात आला आहे. रहिवाशांवरील परिणाम कमी करण्यासाठी अनेक कपात (deductions) आणि सूट (exemptions) समाविष्ट केल्या आहेत, ज्यात  शिक्षणाचा खर्च, आरोग्य सेवांचा खर्च, वारसा संपत्ती, दान, देणग्या, प्राथमिक निवासस्थान यांचा समावेश आहे.

किती लोक कर भरणार?
कर लागू करण्याचा निर्णय घेण्यापूर्वी ओमानमध्ये एक अभ्यास करण्यात आला आहे, जो दर्शवितो की ओमानमधील सुमारे ९९% लोकसंख्या या कराच्या कक्षेत येणार नाही. केवळ १% लोकच यात समाविष्ट असतील.

Web Title: Income tax implemented in Oman Direct impact on 7 lakh Indians