शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
2
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
4
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
5
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
6
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
7
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
8
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
9
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
10
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
11
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
12
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
13
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
14
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
15
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
16
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
17
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
18
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
19
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
20
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप

इम्रान खानचा विजय भारतासाठी अडचणीचाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2018 1:19 AM

अतिरेकी व कट्टरवाद्यांशी संबंध; लष्कर व आयएसआयचाही वाढणार दबाव

इस्लामाबाद/ नवी दिल्ली : कट्टरवादी व अतिरेकी गटांशी संबध असल्याने पाकिस्तानात तालिबान खान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इम्रान खानने भारताशी संबंध सुधारावेत अशी इच्छा इम्रान खान यांनी व्यक्त केली असली तरी त्याचे विजयी होणे भारताला अडचणीचेच ठरण्याची शक्यता आहे. ते पंतप्रधान झाले तरी पाकिस्तानवर तेथील लष्कर तसेच आयएसआय ही गुप्तचर संघटना यांचा दबाव असेल, असे भारत व पाकिस्तानातील तज्ज्ञांचे मत आहे.काश्मीर प्रश्न हा दोन्ही देशांतील महत्त्वाचा मुद्दा असून त्यावर चर्चेद्वारे तोडगा काढण्याची पाकिस्तानची भूमिका आहे, असे सांगतानाच, गेल्या ३० वर्षांत काश्मीरमध्ये भारतीय लष्कराने मोठ्या प्रमाणावर मानवी हक्कांचा भंग केला आहे असाही आरोप त्यांनी केला. गरिबी व दारिद्र्य ही पाकिस्तानसमोरील सर्वात मोठी आव्हाने असून, ती सोडवण्यासाठी आमच्यापुढे चीन हा आदर्श आहे, असे मत त्याने व्यक्त केले. जिना यांच्या स्वप्नातील पाकिस्तान निर्माण करण्यासाठी आपण झटणार आहोत असेही ते म्हणाले.भारतीय प्रसार माध्यमांनी माझे वाईट पद्धतीने चित्रण केले. त्याचे मला दु:ख आहे, मला भारताशी चांगले संबंध हवेत आणि पाकिस्तान व भारत यांच्यातील व्यापार वाढावा, अशी माझी इच्छा आहे, असे ते इम्रान खान म्हणाले. मात्र नवाज शरीफ हे भारताबाबत सौम्य भूमिका घेतात, असा आरोप ते करीत. त्यांच्या पक्षाला सर्वात जास्त जागा मिळाल्या असल्या तरी निवडणुकांत गैरप्रकार झाल्यानेच हे घडल्याचा आरोप नवाज शरीफ यांच्या पक्षाने केले. पण गैरप्रकारांचे आरोप निवडणूक आयोगाने फेटाळले. (वृत्तसंस्था)नवाज शरीफ व त्यांची कन्या मरियम तुरुंगात आहेत. आपण तुरुंगात असल्याचा फायदा आपल्या पक्षाला मिळेल, हा त्यांचा अंदाज पूर्णपणे चुकला आहे. उलट इम्रान खान सत्तेत आल्यास त्यांच्या अडचणी वाढतील.कट्टरवाद्यांना शिकवला धडामुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईद याचे पाठबळ असलेली अल्ला हो अकबर तहरीक व बंदी घातलेल्या इतर संघटना तसेच दहशतवादी, कट्टरपंथी विचारांची मंडळी पाकिस्तानमध्ये सार्वत्रिक निवडणुकांच्या रिंगणात उतरली होती. पण त्यांना मतदारांनी अजिबात थारा दिला नाही.दहशतवादी गटाशी संबंधित असलेल्या एकालाही मतदारांनी विजयी केले नाही. कट्टरपंथी इस्लामी गट या निवडणुकांत उतरल्याने चिंता व्यक्त होत होती. पण आता या सर्व गटांना व व्यक्तींना पाकिस्तानातील मतदारांनी त्यांची जागा दाखवून दिली.सईदचा मुलगा, नातूही पराभूतहाफिज सईदने आपल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी अनेक सभा घेतल्या. पण त्याचा एकही उमेदवार विजयी झाला नाही. सईदचा मुलगा हाफिज तल्हा सईद व नातू खालिद वालिग्द पराभूत झाले. तहरीक-ए-लाबैक पाकिस्तान या सुन्नी संघटनेनेही उभे केलेले १०० उमेदवार विजयाच्या जवळपासही फिरकू शकले नाहीत. मुत्तहिदा मजलिस-ए-अम्ल या काही पक्षांच्या आघाडीच्या उमेदवारांपैकी बहुतेक जणांना पराभव पाहावा लागला.

टॅग्स :Imran Khanइम्रान खानPakistan Electionsपाकिस्तान निवडणूकhafiz saedहाफीज सईदIndiaभारत