Imran Khan: मी, मला आणि माझे! 45 मिनिटांच्या भाषणात इम्रान खान इतक्यांदा बोलले, की पाकिस्तान उडवतोय खिल्ली
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2022 09:25 IST2022-04-02T09:25:41+5:302022-04-02T09:25:59+5:30
गुरुवारी रात्री इम्रान यांनी पाकिस्तानला संबोधित केले. तेव्हा त्यांनी अखेरच्या चेंडूपर्यंत खेळणार असल्याचे सांगत राजीनामा देण्यास नकार दिला.

Imran Khan: मी, मला आणि माझे! 45 मिनिटांच्या भाषणात इम्रान खान इतक्यांदा बोलले, की पाकिस्तान उडवतोय खिल्ली
पाकिस्तानात उठलेल्या राजकीय वादळात इम्रान खान यांची खूर्ची धोक्यात आली आहे. अशावेळी त्यांनी देशवासियांना संबोधित करत भारताची स्तुती गायली, तसेच आधीचे राज्यकर्ते-लष्कर कसे चुकले ते देखील सांगितले. परंतू या ४५ मिनिटांच्या भाषणात त्यांनी मी, माझे आणि मला हेच पाढे म्हटल्याने त्यांच्या भाषणाची आता खिल्ली उडू लागली आहे.
गुरुवारी रात्री इम्रान यांनी पाकिस्तानला संबोधित केले. तेव्हा त्यांनी अखेरच्या चेंडूपर्यंत खेळणार असल्याचे सांगत राजीनामा देण्यास नकार दिला. इम्रान यांच्यावर अविश्वास प्रस्ताव सादर झाला आहे. येत्या दोन दिवसांत त्यावर मतदान होईल आणि राजकीय परिस्थिती पाहता त्यांना पायऊतार व्हावे लागणार आहे.
पाकिस्तानी पत्रकार हमीद मीर याने इम्रान खान यांचा हा व्हिडीओ बनविला आहे. यामध्ये इम्रान खान यांनी मै, मेरा आणि मुझे किती वेळा म्हटले याची खिल्ली उडविली आहे. भाषणात इम्रान खान यांनी स्वत:चा २१३ वेळा उल्लेख केला आहे. यामध्ये ८८ वेळा मैं, १६ वेळा मुझे, ११ वेळा मेरा आणि १४ वेळा इम्रान खान असा उल्लेख केला आहे.
On 46 Mins speech #ImranKhan :
— Lt.Gan Asif Ghufoor 🇵🇰 (@GanGhufoor) April 1, 2022
✔️88 baar "Main"
✔️16 Baar "Mujhe"
✔️11 Baar "Mera"
✔️14 Baar "Imran Khan".
Self Obsessed PM #Pakistan 🇵🇰😭🤣😂
*Skip and laugh* pic.twitter.com/q0d4rX1rSA