'अमेरिकेत जात असाल, तर विचार करून जा'; 'टॅरिफ वॉर'नंतर चीनने आपल्या नागरिकांना केलं सावध

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2025 12:13 IST2025-04-10T12:11:14+5:302025-04-10T12:13:24+5:30

China US Tariff: चीन आणि अमेरिका यांच्यात टॅरिफ युद्ध भडकले आहे. अमेरिकेकडून प्रचंड टॅरिफ आकारला जात असताना चीनने आता देशातील नागरिकांना सावधगिरीचा इशारा दिला आहे.

'If you are going to America, think twice'; China warns its citizens after 'tariff war' | 'अमेरिकेत जात असाल, तर विचार करून जा'; 'टॅरिफ वॉर'नंतर चीनने आपल्या नागरिकांना केलं सावध

'अमेरिकेत जात असाल, तर विचार करून जा'; 'टॅरिफ वॉर'नंतर चीनने आपल्या नागरिकांना केलं सावध

China US Tariff Latest: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफला चीनविरोधात शस्त्र बनवले आहे. नव्या निर्णयात ट्रम्प यांनी चीनवरील टॅरिफ तब्बल १२५ टक्क्यांनी वाढवला आहे. त्याला चीननेही उत्तर दिले असून, अमेरिकन वस्तूंवरील टॅरिफ ५० टक्क्यांवरून ८४ टक्क्यांपर्यंत वाढवला आहे. दोन्ही देशांतील संबंधात तणाव आला असून, चीनच्या सरकारने नागरिकांना अमेरिकेत जाण्याबद्दल सावधगिरीची इशारा दिला आहे. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

चीनच्या सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्रालयाने प्रवाशांसाठी निर्देश जारी केले आहेत. यात मंत्रालयाने चिनी नागरिकांना अमेरिकेत जाणार असाल, तर खबरदारी घेण्यास सांगितले आहे. अमेरिकेत जाण्यापूर्वी संभाव्य अडचणींची पूर्ण माहिती घ्या आणि विचार करून जा, असे म्हटले आहे. 

शिक्षण मंत्रालयाकडून विद्यार्थ्यांना इशारा

चीनच्या शिक्षण मंत्रालयाने विद्यार्थ्यांसाठीही सावधगिरीचा इशारा दिला आहे. अमेरिकेत शिक्षण घेण्याचा निर्णय घेण्यापूर्वी सुरक्षिततेच्या जोखमीची माहिती करून घेण्यास सांगितले आहे. अमेरिकेत जाण्यापूर्वी तुमच्या सुरक्षिततेचा विचार करण्याची सूचना चीन सरकारने नागरिकांना केली आहे. 

आम्हीही गप्प बसणार नाही -चीन

अमेरिकेने भरमसाठ टॅरिफ वाढवल्यामुळे चीननेही आक्रमक भूमिका घेतली आहे. चीननेही ८४ टक्के टॅरिफ लागू करण्याची घोषणा केली आहे. यासंदर्भात चीनमधील वृत्तसंस्था शिन्हुआने वाणिज्य मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या हवाल्याने वृत्त दिले आहे. 

वाचा >अमेरिकेच्या जाळ्यात कसा अडकला ड्रॅगन...? ट्रम्प यांनी चीनवर लादला 125 टक्के टॅरिफ

अधिकाऱ्याने म्हटले आहे की, जर चीनच्या लोकांच्या अधिकारांना आणि त्यांच्या हिताला धक्का पोहोचवला जात असेल, तर चीन सरकार अजिबात गप्प बसणार नाही. 

Web Title: 'If you are going to America, think twice'; China warns its citizens after 'tariff war'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.