"अवामवर बॉम्बस्फोट करुन वेळ मिळाला तर...", भारताच्या क्षितिज त्यागी यांनी संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत पाकिस्तानला सुनावले
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2025 09:50 IST2025-09-24T09:31:03+5:302025-09-24T09:50:55+5:30
संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार परिषदेत, भारताने पाकिस्तानला देशाचा पाया कोणत्या वास्तवावर उभा आहे याची आठवण करून दिली.

"अवामवर बॉम्बस्फोट करुन वेळ मिळाला तर...", भारताच्या क्षितिज त्यागी यांनी संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत पाकिस्तानला सुनावले
पाकिस्तानी लष्कराने दोन दिवसापूर्वी आपल्याच देशातील एका गावावर बॉम्ब हल्ला केला. हा हल्ला खैबर पख्तूनख्वा येथे केला.यामध्ये निराधार आणि निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला. या घटनेवर काल भारताने जगाचे लक्ष वेधले. संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार परिषदेत पाकिस्तानच्या या कृतीकडे भारताने लक्ष वेधले. पाकिस्तान हा जगातील एकमेव देश आहे जो लढाऊ विमानांचा वापर करून स्वतःच्याच नागरिकांवर बॉम्बहल्ला करतो आणि त्यांची हत्या करतो', असे भारताने म्हटले आहे.
Online Shopping Tips : ऑनलाइन खरेदीवर खरोखर सूट मिळते का, कसे ओळखायचे? ध्रुव राठीने सांगितली ट्रिक
२२ सप्टेंबरच्या रात्री पाकिस्तानातील खैबर पख्तूनख्वा येथील तिरह खोऱ्यात पाकिस्तानी सैन्याने बॉम्ब टाकले. या हल्ल्यात महिला आणि मुलांसह तीस लोकांचा मृत्यू झाला. खैबर पख्तूनख्वा येथील स्थानिक प्रतिनिधींनी याला "जेट बॉम्बिंग" म्हटले आहे. चिखलात माखलेल्या मृत मुलांचे, खाटांवर मृतदेहांच्या रांगा असलेले फोटो हृदयद्रावक आहेत. ही निष्पाप मुले दहशतवादी होती का?, असा प्रश्न स्थानिकांनी उपस्थित केला.
जिनेव्हा येथील संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेतील (UNHRC) भारताच्या स्थायी मिशनचे समुपदेशक क्षितिज त्यागी यांनी पाकिस्तानवर दहशतवादाला प्रोत्साहन देण्याचा आणि प्रचारासाठी आंतरराष्ट्रीय व्यासपीठांचा गैरवापर करण्याचा आरोप केला.
क्षितिज त्यागी यांनी पाकिस्तानच्या दुष्कृत्यांचा जगासमोर पद्धतशीरपणे पर्दाफाश केला. "आमच्या भूभागाचा लोभ करण्याऐवजी, त्यांनी बेकायदेशीरपणे व्यापलेला भारतीय भूभाग रिकामा करावा आणि दहशतवाद निर्यात करण्यापासून, स्वतःच्या लोकांवर बॉम्बस्फोट करण्यापासून आणि संयुक्त राष्ट्रांनी प्रतिबंधित दहशतवाद्यांना आश्रय देण्यापासून त्यांच्याकडे वेळ असेल तर त्यांनी त्यांची अर्थव्यवस्था सुधारण्यावर लक्ष केंद्रित करावे, जी जीवनावश्यक आधारावर आहे", असंही क्षितिज त्यागी म्हणाले.
संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार परिषदेच्या या बैठकीत, क्षितिज त्यागी यांनी पुलवामा, उरी, पठाणकोट आणि मुंबईसह मागील हल्ल्यांचा तसेच पहलगाममधील अलिकडच्या हल्ल्याचा उल्लेख केला. त्यांनी पाकिस्तानी नेत्यांच्या ढोंगीपणाकडेही लक्ष वेधले, त्यांनी पूर्वी अल-कायदाचा नेता ओसामा बिन लादेनला आश्रय दिला होता हे निदर्शनास आणून दिले.