'जर डिल रद्द झाली तर सैन्य पाठवणार', डोनाल्ड ट्रम्प यांचा ब्रिटिश पंतप्रधानांना इशारा, भारताबाबत कोणता निर्णय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2026 11:57 IST2026-02-06T11:35:09+5:302026-02-06T11:57:24+5:30

डिएगो गार्सिया लष्करी तळाबाबत यूके-मॉरिशस करारावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक मोठे विधान जारी केले आहे.

'If the deal is canceled, I will send troops', Donald Trump warns British Prime Minister, big decision regarding India | 'जर डिल रद्द झाली तर सैन्य पाठवणार', डोनाल्ड ट्रम्प यांचा ब्रिटिश पंतप्रधानांना इशारा, भारताबाबत कोणता निर्णय?

'जर डिल रद्द झाली तर सैन्य पाठवणार', डोनाल्ड ट्रम्प यांचा ब्रिटिश पंतप्रधानांना इशारा, भारताबाबत कोणता निर्णय?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हिंद महासागरातील धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाच्या डिएगो गार्सिया लष्करी तळाबद्दल आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ब्रिटिश पंतप्रधान केयर स्टारमर यांच्याशी 'सकारात्मक' संभाषणानंतर, ट्रम्प यांनी या करारावरील पूर्वीची कठोर टीका सौम्य केली आणि इशाराही दिला.'जर भविष्यात यूके-मॉरिशस करार कधीही मोडला गेला तर अमेरिका बेट ताब्यात घेण्यासाठी आपले सैन्य पाठवेल, असा इशारा ट्रम्प यांनी दिला.

Ajit Pawar Plane Crash : अजितदादांच्या विमानाचा अपघात कशामुळे झाला? अपघाताचे कारण आले समोर, अहवालात धक्कादायक माहिती

गेल्या महिन्यात, डोनाल्ड ट्रम्प यांनी चागोस बेटांचे सार्वभौमत्व मॉरिशसला देण्याच्या ब्रिटनच्या निर्णयाचा निषेध केला. याला "पूर्ण कमकुवतपणा आणि निव्वळ मूर्खपणा" असे म्हटले. या पार्श्वभूमीवर  ट्रम्प यांनी "ट्रुथ सोशल" वर लिहिले की, पंतप्रधान स्टारमर यांनी केलेला करार हाच सर्वोत्तम पर्याय होता हे त्यांना आता समजले आहे.
 
अमेरिका कोणत्याही परिस्थितीत दिएगो गार्सिया येथील अमेरिकन लष्करी उपस्थिती कमकुवत करणार नाहीत किंवा धोक्यात आणणार नाहीत, असंही ट्रम्प यांनी म्हटले आहे. पंतप्रधान स्टारमर यांनी सध्याच्या परिस्थितीत तडजोड केली आहे हे त्यांना समजले आहे, परंतु भविष्यात जर अमेरिकेच्या कारवाया किंवा तळावरील सैन्याला धोका निर्माण झाला तर अमेरिका निर्णायक कारवाई करण्यास मागेपुढे पाहणार नाही.

लष्करी हस्तक्षेपाचा अधिकार राखीव

ट्रम्प यांनी करार स्वीकारला असला तरी, त्यांनी अमेरिकेच्या हितांचे रक्षण करण्याचा त्यांचा हेतू स्पष्टपणे व्यक्त केला आहे. ट्रम्प यांनी लिहिले, "डिएगो गार्सिया बेटाबद्दल पंतप्रधान केयर स्टारमर यांच्याशी माझी खूप चांगली चर्चा झाली. हे एका मोठ्या अमेरिकन लष्करी तळाचे ठिकाण आहे, हे हिंद महासागराच्या मध्यभागी रणनीतिकदृष्ट्या स्थित आहे आणि अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी महत्त्वाचे आहे. आमच्याकडे जगातील सर्वात शक्तिशाली सैन्य आहे. गेल्या वर्षभरातील आमच्या लष्करी कारवाया आमच्या सैन्याच्या ताकदीमुळे, आमच्या उपकरणांच्या आधुनिक क्षमतांमुळे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आमच्या लष्करी तळाच्या धोरणात्मक स्थानामुळे यशस्वी झाल्या आहेत, असंही ट्रम्प यांनी सांगितले आहे.

'मला माहित आहे की पंतप्रधान स्टारमर यांनी वाटाघाटी केलेला करार अनेकांना त्यांनी केलेला सर्वोत्तम करार मानला जातो. जर भविष्यात भाडेपट्टा करार खंडित झाला किंवा कोणी आमच्या तळावरील अमेरिकन कारवाया आणि सैन्याला धोका निर्माण केला किंवा धोक्यात आणला, तर मी दिएगो गार्सियावरील अमेरिकेच्या उपस्थितीला लष्करीदृष्ट्या सुरक्षित करण्याचा आणि मजबूत करण्याचा अधिकार राखून ठेवतो, असंही ट्रम्प म्हणाले.

चागोस बेटे कोणती आहेत?

चागोस बेटे हिंद महासागराच्या मध्यभागी स्थित ६० हून अधिक लहान बेटांचा समूह आहे. सामरिकदृष्ट्या महत्त्वाचे, हा प्रदेश भारत, आफ्रिका आणि आग्नेय आशियामधील सागरी मार्गांच्या मध्यभागी आहे. दिएगो गार्सिया हे त्याचे सर्वात मोठे आणि महत्त्वाचे बेट आहे. १९६५ मध्ये मॉरिशसच्या स्वातंत्र्यापूर्वी, ब्रिटनने चागोसला मॉरिशसपासून वेगळे केले आणि त्याला "ब्रिटिश हिंद महासागर प्रदेश" घोषित केले. १९६० आणि १९७० च्या दशकात, ब्रिटनने अंदाजे २००० स्थानिक रहिवाशांना जबरदस्तीने बेदखल केले जेणेकरून अमेरिका तेथे लष्करी तळ बांधू शकेल. मॉरिशस अनेक दशकांपासून बेटांवर सार्वभौमत्वाचा दावा करत आहे. २०१९ मध्ये, आंतरराष्ट्रीय न्यायालयने ब्रिटनचा ताबा बेकायदेशीर घोषित केला आणि बेटे मॉरिशसला परत करण्याची शिफारस केली.

Web Title : ट्रंप की यूके पीएम को चेतावनी: डिएगो गार्सिया समझौते में सैन्य हस्तक्षेप

Web Summary : ट्रंप ने यूके-मॉरीशस समझौते से अमेरिकी उपस्थिति खतरे में पड़ने पर डिएगो गार्सिया में सैन्य हस्तक्षेप की धमकी दी। पिछली आलोचना के बावजूद, अब वे समझौते को सबसे अच्छा विकल्प मानते हैं और अमेरिकी हितों और रणनीतिक सैन्य अड्डे की रक्षा करने की कसम खाते हैं।

Web Title : Trump Warns UK PM: Military if Diego Garcia Deal Fails

Web Summary : Trump threatened military intervention in Diego Garcia if the UK-Mauritius deal jeopardizes US presence. Despite past criticism, he now sees the agreement as the best option, vowing to protect American interests and the strategic military base.