शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधी पक्षांसह सत्ताधारी आमदार, खासदार 'मैदाना'त, उपोषणावर बसलेले मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत दिला पाठिंबा
2
आजचे राशीभविष्य, ३० ऑगस्ट २०२५: कौटुंबिक वातावरण आनंदी असेल, वाणीवर संयम ठेवावा !
3
महाराष्ट्रात ३४ हजार कोटींची गुंतवणूक; ३३ हजार रोजगार
4
फडणवीसांचे सरकार पाडण्यासाठी अजित पवारांचे नेते सामील, लक्ष्मण हाके यांचा आरोप
5
मुंबईत आलेल्या मराठा आंदोलकांचे खाण्यापिण्याचे हाल; गाडीतच स्वयंपाक, तिथेच जेवण
6
आंदोलनादरम्यान, पोलिसांच्या मदतीला पाऊस आला धावून...
7
...आणि पोलिसांचा थेट जरांगे यांना व्हिडीओ कॉल!
8
मराठा बांधवांनो, फक्त १० रुपयांत मुंबईत राहा, अशी आहे शक्कल
9
उर्जित पटेल आयएमएफच्या कार्यकारी संचालकपदी
10
मुसळधार पावसाचा सामना करत मुंबईमध्ये लोटला 'मराठा'सागर
11
Manoj Jarange Patil Morcha Update Live: मराठ्यांना आरक्षण देऊन टाकावं, मनं जिंकण्याची हीच संधी : मनोज जरांगे-पाटील
12
विजयाशिवाय मागे हटणार नाही, सरकारने सहकार्य केले, आपणही सहकार्य करू : जरांगे पाटील
13
भारतावरील 'टॅरिफ' रशियन तेलामुळे नाही, तर ट्रम्प यांच्या नाराजीमुळे; अमेरिकन कंपनीचा दावा
14
आरक्षण द्यायचं, आंदोलन मोडायचं, की मला गोळ्या घालायच्या...; मनोज जरांगे-पाटील यांचा थेट इशारा
15
जेवणात भाजी का बनवली नाही? पतीने पत्नीला रागात विचारलं; चिडलेल्या पत्नीने टोकाचं पाऊल उचललं!
16
ऐन गणेशोत्सवात लालबागला जाणाऱ्या प्रवाशांचा होणार खोळंबा : ब्लॉकमुळे चिंचपोकळी, करीरोड स्टेशनवर लोकल नसणार!
17
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इच्छा पूर्ण होणार, प्रत्येक कोपऱ्यात मराठे दिसणार! मनोज जरांगे-पाटील काय म्हणाले?
18
५० कोटींची अत्याधुनिक इमारत; CM योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते उत्तर प्रदेश निवडणूक आयोगाच्या नवीन कार्यालयाचे भूमीपूजन!
19
उधारीच्या वादातून वाहन विक्रेत्याचे अपहरण, मारहाणीचा व्हिडीओ स्नॅपचॅटवर अपलोड!
20
नागपूर हादरले! चाकू काढला आणि छातीवर सपासप वार; दहावीतील विद्यार्थिनीची शाळेसमोरच हत्या

"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2025 22:02 IST

जर युरोपीय देशांनी अमेरिकेकडून लष्करी उपकरणे खरेदी केले आणि ते युक्रेनला हस्तांतरित केली तर आपल्याला कोणताही आक्षेप नाही, असेही डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे...

जर रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेनमधील युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर त्याला मोठ्या प्रमाणावर टॅरिपचा सामना करावा लागेल. केवळ युद्ध थांबावे, एवढीच आपली इच्छा आहे. रशियानेही युद्ध थांबवून व्यापारावर लक्ष केंद्रित करावे, असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. ते ओव्हल ऑफिसमध्ये नाटोचे सरचिटणीस मार्क रूट यांच्याशी झालेल्या चर्चेदरम्यान बोलत होते.

रशियावर 100 टक्के टॅरिफचा इशारा -व्हाइट हाऊसने डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान अधिक स्पष्ट करत म्हटले आहे की, "त्यांनी (डोनाल्ड ट्रम्प) रशियाला 100 टक्के टॅरिफचा इशारा दिला आहे. तसेच, दुय्यम कराचा अर्थ असा की, रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या देशांवरही अतिरिक्त टॅरिफ लादला जाईल." 

...तर रशियाच्या आर्थिक भागीदारांवरही अतिरिक्त शुल्क लादले जाईल -ट्रम्प म्हणाले, जर रशियाने आपले ऐकले नाही, तर त्याला जगभरात एकाकी पाडण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला जाईल. रशियाच्या आर्थिक भागीदारांवरही अतिरिक्त शुल्क लादले जाईल. एवढेच नाही तर, युरोप मजबूत राहणे महत्त्वाचे आहे. अशा स्थितीत, जर युरोपीय देशांनी अमेरिकेकडून लष्करी उपकरणे खरेदी केले आणि ते युक्रेनला हस्तांतरित केली तर आपल्याला कोणताही आक्षेप नाही, असेही डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे.

रशियाकडून तेलाची आयात करणाऱ्या देशांमध्ये भारताचाही समावेश -महत्वाचे म्हणजे, रशियाकडून तेलाची आयात करणाऱ्या देशांमध्ये भारताचाही समावेश आहे. यापूर्वी अनेकवेळा भारताच्या रशियाकडून तेल खरेदीवर अमेरिकेने आक्षेप घेलता आहे. मात्र, भारताने प्रत्येक वेळा देश हिताच्या मुद्द्यावर बोलत अमेरिकेच्या आक्षेपाकडे दुर्लक्ष केले आहे. 

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पRussia Ukrainयुक्रेन आणि रशियाVladimir Putinव्लादिमीर पुतिनAmericaअमेरिका