शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

इराणमधील 52 ठिकाणे निशाण्यावर, डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2020 09:07 IST

अमेरिकी नागरिक आणि अमेरिकेच्या स्थळांवर हल्ला करणाऱ्यांना वेचून वेचून ठार केले जाईल.

तेरहान - इराणमधील सर्वात शक्तिशाली व्यक्तींपैकी एक असलेले सर्वोच्च लष्करी कमांडर कासिम सुलेमानी यांची अमेरिकेने ड्रोण हल्ला करून हत्या केल्याने इराण आणि अमेरिकेतील तणाव कमालीचा वाढला आहे. दरम्यान, सुलेमानी यांच्या हत्येचा बदला घोषणा इराणकडून करण्यात आली असून, शनिवारी रात्री इराण समर्थित मिलिशियाने इराकमधील अमेरिकन दुतावासासह अन्य काही अमेरिकन ठिकाण्यांवर रॉकेट आणि मोर्टारने हल्ले केले. तसेच शनिवारी सकाळी ईराणने जामकरन मशिदीवर लाल झेंडा फडकवून युद्धाचे संकेत दिले आहेत. दरम्यान, इराणकडून झालेल्या रॉकेट हल्लानंतर इराणमधील महत्त्वाची 52 ठिकाणे निशाण्यावर असल्याचा इशारा अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे.अमेरिकी ठिकाण्यांवरील रॉकेट हल्ल्यांनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ''अमेरिकी नागरिक आणि अमेरिकेच्या स्थळांवर हल्ला करणाऱ्यांना वेचून वेचून ठार केले जाईल. जर इराणने आमच्या ठिकाणांवर हल्ला केला तर आम्ही त्यांच्या 52 ठिकाणांवर संहारक हल्ला करून ती नष्ट करू. ही 52 ठिकाणे इराण आणि त्याच्या संस्कृतीसाठी फार महत्त्वाची आहेत,''असा सज्जड इशाराच ट्रम्प यांनी दिला आहे.  

दुसरीकडे शनिवारी सकाळी ईराणने जामकरन मशिदीवर लाल झेंडा फडकवून युद्धाचे संकेत दिले आहेत. कोम येथील जामकरन मशिदीवर सर्वसामान्यपणे धार्मिक झेंडे फडकवले जातात. त्यामुळे धार्मिक झेंडे काढून लाल झेंडा फडकवण्याचा अर्थ युद्धाच्या घोषणेच्या रूपात घेतला जात आहे. कारण लाल झेंड्याचा अर्थ दु:ख व्यक्त करणे नसते. त्यामुळे आता इराण आपल्या देशवासियांना अशा आपातकालिन स्थितीस तयार राहण्यास सांगत आहे. जी त्यांनी याआधी कधीही पाहिलेली नाही. अगदी इराण आणि इराकमधील युद्धावेळी सुद्धा लाल झेंडा फडकवण्यात आला नव्हता. इराणमधील कुठल्याही मशिदीवर लाल झेंडा फडकवण्यात आल्याची घटना पहिल्यांदाच घडली आहे.  शनिवारी रात्री इराकमधल्या अमेरिकी दूतावासावर रॉकेटचा मोठा हल्ला करण्यात आला होता. मिळालेल्या माहितीनुसार, राजधानी बगदादमध्ये अमेरिकी दूतावासात रॉकेट डागण्यात आले. या हल्ल्यामुळे इराकमध्ये खळबळ उडाली. स्थानिक सुरक्षा सूत्रांच्या माहितीनुसार, इराकची राजधानी बगदादमधल्या ग्रीन झोनमध्ये अमेरिकी दूतावासात एका रॉकेटचा स्फोट झाला. बगदादमधल्या ग्रीन झोनमधल्या अमेरिकी दूतावासाच्या आत कत्युषा रॉकेटनं हल्ला करण्यात आला. परंतु या हल्ल्यात किती नुकसान झालं हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. या हल्ल्यानंतर बगदादच्या आकाशात अमेरिकेची विमानं घिरट्या घालताना दिसत होती. इराक स्थित बलाद एअरफोर्सवरही दोन रॉकेट डागण्यात आली आहेत. अमेरिकी सैनिकांची तिकडेसुद्धा छावणी होती. 

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पUnited StatesअमेरिकाIranइराण