शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

'भारताने रशियाचे तेल घेणे बंद केले नाही तर...', ट्रम्प यांच्या सल्लागाराने भारत सरकारला आणखी टॅरिफ वॉरची धमकी दिली

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2025 17:44 IST

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारतावर शुल्क लादण्याच्या निर्णयाची जगभरात चर्चा होत आहे. या निर्णयाला अमेरिकन कायदेकर्त्यांकडूनही विरोध होत आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताविरोधात टॅरिफ लादल्यानंतर जगभरात चर्चा सुरू आहे. तर दुसरीकडे,  अमेरिकेत या निर्णयाचा विरोध सुरू आहे.

रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू

दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांचे सर्वोच्च आर्थिक सल्लागार यांनीही भारत सरकारला रशियन तेल खरेदी करण्याविरुद्ध धमकी दिली.  'जर भारताने रशियन कच्च्या तेलाच्या व्यापारावर अंकुश लावला नाही तर अमेरिकन अध्यक्ष कोणत्याही प्रकारे टॅरिफ हटवणार नाहीत, असा इशारा अमेरिकेच्या राष्ट्रीय आर्थिक परिषदेचे संचालक केविन हॅसेट यांनी दिला.

हॅसेट यांनी आरोप केले

केविन हॅसेट यांनी भारत सरकारवर टीका केली. अमेरिका-भारत व्यापार चर्चा आता गुंतागुंतीची झाली आहे आणि भारत अमेरिकन उत्पादनांसाठी बाजारपेठ उघडण्यात हट्टी वृत्ती स्वीकारत आहे, असा आरोप त्यांनी केला. 

'जर भारताने माघार घेतली तर मला वाटत नाही की राष्ट्राध्यक्ष ट्रम्प झुकतील, असंही हॅसेट म्हणाले. अमेरिकेने बुधवारी भारतीय वस्तूंवरील शुल्क दुप्पट करून ५० टक्के केले, जे ब्राझील वगळता इतर कोणत्याही देशासाठी सर्वाधिक आहे. यामध्ये भारताकडून रशियन कच्च्या तेलाच्या खरेदीवर २५ टक्के अतिरिक्त शुल्क देखील समावेश आहे.

'भारतासोबतच्या व्यापार वाटाघाटी देखील गुंतागुंतीच्या आहेत आणि ट्रम्प यांनी केवळ  शांतता करार करण्यासाठी आणि लाखो लोकांचे जीव वाचवण्यासाठी दबाव आणण्यासाठी शुल्क लादले असा दावा त्यांनी केला.

भारताची भूमिका काय?

भारताने अमेरिकेच्या दबावापुढे झुकणार नाही असे म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील शेतकऱ्यांच्या हिताशी कधीही तडजोड करणार नाही असं म्हणाले आहेत.

या शुल्कांमुळे अमेरिकेला होणाऱ्या भारतीय निर्यातीवर ४८.२ अब्ज डॉलर्सचा परिणाम होईल, असा सरकारचा अंदाज आहे.

टॅग्स :AmericaअमेरिकाIndiaभारतDonald Trumpडोनाल्ड ट्रम्प