'भारताने रशियाचे तेल घेणे बंद केले नाही तर...', ट्रम्प यांच्या सल्लागाराने भारत सरकारला आणखी टॅरिफ वॉरची धमकी दिली
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2025 17:44 IST2025-08-28T17:39:37+5:302025-08-28T17:44:50+5:30
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारतावर शुल्क लादण्याच्या निर्णयाची जगभरात चर्चा होत आहे. या निर्णयाला अमेरिकन कायदेकर्त्यांकडूनही विरोध होत आहे.

'भारताने रशियाचे तेल घेणे बंद केले नाही तर...', ट्रम्प यांच्या सल्लागाराने भारत सरकारला आणखी टॅरिफ वॉरची धमकी दिली
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताविरोधात टॅरिफ लादल्यानंतर जगभरात चर्चा सुरू आहे. तर दुसरीकडे, अमेरिकेत या निर्णयाचा विरोध सुरू आहे.
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांचे सर्वोच्च आर्थिक सल्लागार यांनीही भारत सरकारला रशियन तेल खरेदी करण्याविरुद्ध धमकी दिली. 'जर भारताने रशियन कच्च्या तेलाच्या व्यापारावर अंकुश लावला नाही तर अमेरिकन अध्यक्ष कोणत्याही प्रकारे टॅरिफ हटवणार नाहीत, असा इशारा अमेरिकेच्या राष्ट्रीय आर्थिक परिषदेचे संचालक केविन हॅसेट यांनी दिला.
हॅसेट यांनी आरोप केले
केविन हॅसेट यांनी भारत सरकारवर टीका केली. अमेरिका-भारत व्यापार चर्चा आता गुंतागुंतीची झाली आहे आणि भारत अमेरिकन उत्पादनांसाठी बाजारपेठ उघडण्यात हट्टी वृत्ती स्वीकारत आहे, असा आरोप त्यांनी केला.
'जर भारताने माघार घेतली तर मला वाटत नाही की राष्ट्राध्यक्ष ट्रम्प झुकतील, असंही हॅसेट म्हणाले. अमेरिकेने बुधवारी भारतीय वस्तूंवरील शुल्क दुप्पट करून ५० टक्के केले, जे ब्राझील वगळता इतर कोणत्याही देशासाठी सर्वाधिक आहे. यामध्ये भारताकडून रशियन कच्च्या तेलाच्या खरेदीवर २५ टक्के अतिरिक्त शुल्क देखील समावेश आहे.
'भारतासोबतच्या व्यापार वाटाघाटी देखील गुंतागुंतीच्या आहेत आणि ट्रम्प यांनी केवळ शांतता करार करण्यासाठी आणि लाखो लोकांचे जीव वाचवण्यासाठी दबाव आणण्यासाठी शुल्क लादले असा दावा त्यांनी केला.
भारताची भूमिका काय?
भारताने अमेरिकेच्या दबावापुढे झुकणार नाही असे म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील शेतकऱ्यांच्या हिताशी कधीही तडजोड करणार नाही असं म्हणाले आहेत.
या शुल्कांमुळे अमेरिकेला होणाऱ्या भारतीय निर्यातीवर ४८.२ अब्ज डॉलर्सचा परिणाम होईल, असा सरकारचा अंदाज आहे.