शहरं
Join us  
Trending Stories
1
'शांतता चर्चा केली नाही तर युक्रेनचा आणखी भाग बळकावू'; व्लादिमीर पुतीन यांची धमकी, युरोपीय नेत्यांना म्हणाले डुकराच्या औलादी
2
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
3
Ram Sutar: शिल्पकलेचा उपासक गेला! महाराष्ट्र भूषण राम सुतार यांचे निधन
4
'धुरंधर'ला मिळालेलं प्रेम पाहून अखेर अक्षय खन्नाने दिली पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दात म्हणाला-
5
दिल्ली-एनसीआर दाट धुक्यात बुडाले, IND विरुद्ध SA चौथा T20I सामना रद्द; दृश्यमानता शून्यावर
6
SEBI नं तीन दशकं जुन्या ब्रोकिंगच्या नियमांत केले महत्त्वाचे बदल; अनेक मोठ्या सुधारणांनाही मंजुरी, जाणून घ्या
7
...तर पाकिस्तानात उद्रेक होणार?, फिल्ड मार्शल असीम मुनीर संकटात सापडले; अमेरिकेचा दबाव वाढला
8
नाशिकमध्ये भाजपा-शिंदेसेना महायुतीत ८५-३७ चा फॉर्म्युला; उद्धवसेना-मनसेचं तगडं आव्हान
9
आजचे राशीभविष्य, १८ डिसेंबर २०२५: या राशींना धनप्राप्ती होईल, आज यांचे विवाह जुळतील
10
आता कुठे गेले कोपर-ढोपर? आयपीएलचे करोडोंचे लिलाव आणि हतबल शेतकऱ्याची 'किडनी' विक्री
11
जास्त पीक! शेतात तयार झाल्या प्रचंड 'विहिरी'! तुर्कीतील शेतकऱ्यांनी स्वतःहून ओढवून घेतलेली आपत्ती
12
शरद पवार गट काँग्रेसची साथ सोडून ठाकरे बंधूंच्या आघाडीत सहभागी?
13
कोकाटेंना भोवला सदनिका घोटाळा; आमदारकी गेली, खाते काढून घेतले!
14
कार्गो वाहतूक नवी मुंबईहून झाल्यास राज्याला फायदा; वाहतूककोंडीवर मात करण्यास होणार मदत
15
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
16
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
17
काँग्रेस 'मविआ'त नाही; आता मनसे, उद्धवसेनेची आघाडी, मुंबई महापालिकेचे गणित बदलले
18
भारतीय चवीचा जागतिक गौरव! जगभरातील सर्वोत्तम गोड पदार्थांत कुल्फी, फिरनीचा समावेश
19
आता टोल नाक्यांवर एआय, जाता येणार ८०च्या स्पीडने; थांबण्याची अन् ट्रॅफिकची कटकट संपणार, २०२६ मध्ये अंमलबजावणी
20
अणुऊर्जा क्षेत्र आता खासगी क्षेत्रासाठी खुले होणार; शांती विधेयक लोकसभेत बहुमताने मंजूर!
Daily Top 2Weekly Top 5

झाकीर नाईकच्या प्रत्यार्पणासाठी भारताने विनंती केल्यास त्याला स्वाधीन करू, मलेशिया सरकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2017 17:47 IST

क्वालालंपूर- मुस्लिम तरुणांना भडकावू भाषण देऊन चिथावणारा मुस्लिम धर्मप्रचारक झाकिर नाईकच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

क्वालालंपूर- मुस्लिम तरुणांना भडकावू भाषण देऊन चिथावणारा मुस्लिम धर्मप्रचारक झाकिर नाईकच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. झाकीर नाईकच्या प्रत्यार्पणासाठी भारताने विनंती केल्यास त्याला भारताच्या स्वाधीन करू, असं विधान मलेशिया सरकारनं केलं आहे.नाईकवर दहशतवाद्यांना निधी पुरवणं, हवालामार्फत पैसा कमावल्याचा आरोप आहे. त्यामुळेच तो सध्या मलेशियात फरार झाला आहे. परंतु जर भारत सरकारनं झाकीर नाईकच्या प्रत्यार्पणाची मागणी केली तर त्याला भारताच्या हवाली करण्यात येईल, असंही मलेशियाचे उपपंतप्रधान अहमद जाहीद हमिदी यांनी सभागृहात स्पष्ट केलं आहे. तसेच भारतानं अजूनपर्यंत अशी मागणी केली नसल्याचंही सांगितलं आहे. झाकीर नाईकनं मलेशियातील कोणत्याही कायद्याचं उल्लंघन केलेलं नाही. त्यामुळे त्याचा पासपोर्ट अवैध ठरवता येणार नाही. भारतानंही या प्रकरणात मलेशिया सरकारला पत्र पाठवल्याचं समोर आलं आहे. धार्मिक प्रवचनांच्या नावाखाली कट्टर इस्लामचा प्रचार करत तरुणांची डोकी भडकविण्यासह इतर आर्थिक गुन्ह्यांसाठी भारतातील तपास यंत्रणांना हवा असलेला वादग्रस्त धर्मप्रचारक डॉ. झाकिर नाईक याला कायम वास्तव्याचा परवान्याद्वारे मलेशियाने आसरा दिला आहे.पाच वर्षे मलेशियात राहात असलेल्या झाकिर नाईकने येथे बस्तान बसविले आहे. पंतप्रधानांसह बड्या मंडळींसोबत ऊठबस असलेला नाईक स्वत:हून भारतात परतण्याची किंवा त्याला पाठविले जाण्याची शक्यता नाही. गेल्याच आठवड्यात भारताच्या अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) नाईकविरुद्ध ‘मनी लाँड्रिंग’च्या गुन्ह्याबद्दल आरोपपत्र दाखल केले होते.ब्रिटन व बांगलादेशने प्रवेशबंदी घातलेल्या नाईकला मलेशियाने आसरा दिल्याने या बहुधर्मी देशात कट्टर इस्लामी विचारांचा पगडा वाढत असल्याचे जाणकारांना वाटते. पंतप्रधान नजिब रझ्झाक यांच्या सत्ताधारी आघाडीला सन २०१३च्या निवडणुकीत मोठा धक्का बसल्यानंतर त्यांनी बहुसंख्येने असलेल्या मुस्लिमांचे तुष्टिकरण करण्यासाठी कट्टरपंथी विचारसरणीशी सलगी केल्याचे दिसते.पंतप्रधान रझ्झाक व इतर मंत्री जेथे नमाज पढतात, त्या कुआलालंपूरमधील मशिदीत नाईक प्रवचने देतो. अंगरक्षकासह मशिदीतून बाहेर पडल्यावर त्याच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी भाविकांची झुंबड उडाल्याची छायाचित्रे गेल्या महिन्यात झळकली होती. त्याआधी पंतप्रधान रझ्झाक व उपपंतप्रधान अहमद झाहिद हमिदी यांनी नाईकसोबतचे फोटो फेसबूकवर टाकले होते.नाईक महिनाभर नियमित प्रवचने देत असल्याचे मशिदीच्या प्रशासकांनी सांगितले. त्याची अन्य मशिदींतील प्रवचने ऐकल्याचे व त्याला इस्पितळे व उपाहारगृहांमध्ये फिरताना पाहिल्याचे लोक सांगतात. नाईकने भारतातील न्यायालयांनी काढलेल्या समन्सना प्रतिसाद दिलेला नाही. मात्र अन्य माध्यमांतून आरोपांचे खंडन केले आहे. पुत्रा मशिदीतून बाहेर पडल्यावर एका वृत्तसंस्थेच्या महिला प्रतिनिधीने भारतातातील खटल्यांविषयी विचारता नाईकने, ‘एका स्त्रीशी असे जाहीरपणे बोलणे प्रशस्त वाटत नाही’, या शब्दांत उत्तर देण्याचे टाळले होते.

झुकते माप नाहीझाकिर नाईकना कायम वास्तव्याचा परवाना देताना झुकते माप दिलेले नाही. गेली पाच वर्षे ते मलेशियात राहात आहेत व त्यांनी कायदा व नियम मोडल्याचे एकही प्रकरण नाही. त्यामुळे त्यांना ताब्यात घेण्याचे किंवा अटक करण्याचे कारण नाही. दहशतवादाशी संबंधित खटल्यांतील आरोपी म्हणून नाईक याच्या प्रत्यार्पणाचा प्रस्ताव भारत सरकारकडून आलेला नाही.- अहमद झाहिद हमिदी, उपपंतप्रधान, मलेशिया (संसदेतील निवेदन)

टॅग्स :Zakir Naikझाकीर नाईकCrimeगुन्हा