शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकेनं ग्रीनलँडवर केला कब्जा तर रशियाही 'या' ७ देशांवर झेंडा फडकवणार?; जगात खळबळ माजणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2026 16:59 IST

पाश्चात्य देशांना अनेकदा लक्ष्य करणारे अलेक्झांडर डुगिन यांनी आंतरराष्ट्रीय मानकांऐवजी बळजबरीने दावे निश्चित केले जात असतील तर अशा जगात रशियाला आपली विश्वासार्हता निर्माण करण्यासाठी "काहीतरी भयानक" करावे लागेल असं सांगितले.

मॉस्को - अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी ग्रीनलँडवर कब्जा करण्यासाठी डेन्मार्कसह नाटो देशांना धमकी देत आहेत. ट्रम्प यांनी एक नकाशा जारी केला ज्यात त्यांनी ग्रीनलँड, व्हेनेझुएला आणि कॅनडाला अमेरिकेचा भाग असल्याचं दाखवले. ग्रीनलँडबाबत ट्रम्प यांच्या भूमिकेने युरोपातील नाटो देश चांगलेच भडकले आहेत. नाटो देशांनी त्यांचे सैनिक ग्रीनलँडला पाठवले आहे परंतु ट्रम्प त्यांच्या भूमिकेवर अडून राहिलेत. त्यातच रशियाचे राष्ट्रपती व्लादीमीर पुतिन यांचे गुरु अलेक्झांडर डुगिन यांनी मोठं विधान केले आहे. ज्यारितीने अमेरिका ग्रीनलँडवर दावा करत आहेत, ते पाहता उद्या रशियाही जगातील ७ देशांवर कब्जा करण्याचा दावा करू शकते असं त्यांनी म्हटलं.

या ७ देशांमध्ये आर्मेनिया, जॉर्जिया, अझरबैजान, कझाकस्तान, उझबेकिस्तान, ताजिकिस्तान आणि किर्गिस्तान हे संभाव्य लक्ष्य असण्याची शक्यता आहे. सोव्हिएत काळात हे सर्व रशियाच्या प्रभावाखालील भाग होते. रशियाचे राष्ट्रपती पुतिन यांच्या जवळचे असलेले अलेक्झांडर डुगिन यांनी म्हटलंय की, ट्रम्प ज्या पद्धतीने ग्रीनलँडवर कब्जा करण्यासाठी दबाव आणत आहेत. त्यातून रशियालाही पूर्ण युरेशिया परिसरात आंतरराष्ट्रीय कायद्याकडे दुर्लक्ष करत त्यांची जमीन वाढवण्याची संधी आहे. पाश्चात्य देशांना अनेकदा लक्ष्य करणारे अलेक्झांडर डुगिन यांनी आंतरराष्ट्रीय मानकांऐवजी बळजबरीने दावे निश्चित केले जात असतील तर अशा जगात रशियाला आपली विश्वासार्हता निर्माण करण्यासाठी "काहीतरी भयानक" करावे लागेल असं सांगितले.

तसेच जागतिक सुरक्षेसाठी ग्रीनलँडवर कब्जा करणे अमेरिकेसाठी आवश्यक आहे तर रशियालाही त्यांचा प्रादेशिक विस्तार करायला हवा. जर अमेरिका राष्ट्रीय सुरक्षेच्या नावाखाली नवीन प्रदेशावर दावा करत असेल तर रशियालाही हे करावे लागेल. केवळ क्रूरता, ताकद आणि व्यापक विनाश हे ट्रम्प यांच्यासाठी महत्त्वाचे आहे असंही अलेक्झांडर डुगिन यांनी ट्रम्प यांच्या विधानाचा वारंवार दाखला देऊन सांगत होते.

दरम्यान, अलेक्झांडर डुगिन यांनी आर्मेनिया, जॉर्जिया, अझरबैजान, कझाकस्तान, उझबेकिस्तान, ताजिकिस्तान आणि किर्गिस्तान यासारख्या क्षेत्रांची यादी केली आणि रशियाने या क्षेत्रांमध्ये प्रभाव स्थापित करण्यासाठी हालचाल करावी असं म्हटलं. हे रशियाच्या वसाहतवादी प्रभावाची पुनर्बांधणी करण्याचा प्रयत्न म्हणून सादर केले पाहिजे. मॉस्कोने आंतरराष्ट्रीय कायद्याला मागे टाकून "युरेशियन मोनरो डॉक्ट्रिन" स्वीकारावे आणि अमेरिका, रशिया आणि चीनचे वर्चस्व असलेले जग स्वीकारावे असं डुगिन यांनी पुतिन यांना सल्ला दिला. 

मध्य आशिया आणि काकेशसमध्ये रशिया प्रभाव वाढवणार?

जर ट्रम्प म्हणतायेत की हा माझा प्रदेश आहे आणि तो अमेरिकन असेल, तर आपणही म्हणायला हवे की हा आमचा प्रदेश आहे, तो रशियन असेल. रशियाने मध्य आशिया आणि काकेशसमध्ये मोठ्या प्रमाणात आपला राजकीय, आर्थिक आणि लष्करी प्रभाव वाढवत राहावे. या प्रदेशातील लाखो लोक रशियामध्ये काम करतात आणि त्यांच्या देशांमध्ये पैसे पाठवतात. डुगिन यांनी बाल्टिक देश आणि मोल्दोव्हावर दबाव आणण्याविरुद्ध इशाराही दिला.

टॅग्स :AmericaअमेरिकाDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पrussiaरशियाVladimir Putinव्लादिमीर पुतिन