शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

'अमेरिकेने हल्ला केला तर याद राखा!'; इराणच्या धमकीने ट्रम्प यांची झोप उडाली, आखातात युद्धाचे ढग?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2026 23:01 IST

जागतिक राजकारणात सध्या इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष शिगेला पोहोचला आहे.

जागतिक राजकारणात सध्या इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष शिगेला पोहोचला आहे. अमेरिकेने इराणवर नव्याने लादलेल्या आर्थिक निर्बंधांमुळे चिडलेल्या इराणने थेट वॉशिंग्टनला युद्धाची धमकी दिली आहे. "जर अमेरिकेने इराणवर हल्ला करण्याचे धाडस केले, तर मध्यपूर्वेतील सर्व अमेरिकन सैन्य तळांना आम्ही उद्ध्वस्त करू," असा इशारा इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी दिला आहे. या धमकीमुळे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरील अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

चर्चेच्या दुसऱ्याच दिवशी ठिणगी

विशेष म्हणजे, ओमानच्या मध्यस्थीने शुक्रवारी उभय देशांमध्ये सकारात्मक चर्चा झाली होती. अणू कराराबाबत अप्रत्यक्ष चर्चा सुरू ठेवण्यावर दोन्ही देशांचे एकमत झाले होते. मात्र, त्यानंतर अवघ्या २४ तासांत अराघची यांनी हे आक्रमक विधान केल्याने चर्चेच्या यशावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. अराघची यांनी स्पष्ट केले की, आमचा हल्ला त्या देशांवर नसेल जिथे अमेरिकन तळ आहेत, तर आमचे लक्ष्य केवळ अमेरिकन सैन्य असेल.

ट्रम्प यांची डेडलाईन आणि निर्बंध

डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यपूर्व भागात अमेरिकन नौदलाची तैनात वाढवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, इराणने युरेनियम संवर्धन तातडीने थांबवावे, अन्यथा परिणाम भोगण्यास तयार राहावे, अशी तंबी दिली आहे. अमेरिकेचा आरोप आहे की इराण परमाणू अस्त्रे बनवण्याच्या तयारीत आहे. यासोबतच इराणने आपला बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कार्यक्रम बंद करावा आणि प्रादेशिक सशस्त्र गटांना पाठिंबा देणे थांबवावे, अशीही अमेरिकेची मागणी आहे.

पुढील चर्चा कधी?

अब्बास अराघची यांनी 'अल जजीरा' वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, "अमेरिकेसोबतच्या पुढील चर्चेची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही. मात्र, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी पुढील आठवड्यात चर्चेचे संकेत दिले आहेत. चर्चा लवकर व्हावी, असे दोन्ही देशांना वाटते, पण अमेरिकेची आक्रमक भूमिका आम्हाला मान्य नाही."

काय आहे तणावाचे मुख्य कारण?

इराण अणू बॉम्ब बनवत असल्याचा अमेरिकेला संशय आहे. ट्रम्प सरकारने इराणच्या अर्थव्यवस्थेची नाकेबंदी करण्यासाठी नवे निर्बंध लादले आहेत. आखाती समुद्रात अमेरिकेने युद्धनौका पाठवल्याने इराण बिथरला आहे. इराणने नेहमीच आपल्या अणू कार्यक्रमाचा उद्देश शांततापूर्ण आणि ऊर्जेसाठी असल्याचे म्हटले आहे. मात्र, ट्रम्प यांच्या पुनरागमनानंतर मॅक्झिमम प्रेशर धोरणामुळे दोन्ही देशांमधील संबंध पुन्हा एकदा टोकाला पोहोचले आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Iran Warns America: Attack Means Devastation! Trump Anxious, Gulf War Looms?

Web Summary : Iran threatened to obliterate US bases if attacked, escalating tensions after nuclear talks. Trump issued uranium enrichment deadline amidst rising concerns over Iran's nuclear ambitions and regional activities, further straining relations and raising war fears.
टॅग्स :AmericaअमेरिकाIranइराण