"अमेरिकेनं हल्ला केला, तर आम्हालाही अणुबॉम्ब...!" इराणची मोठी धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2025 11:36 IST2025-04-01T11:35:14+5:302025-04-01T11:36:16+5:30

खामेनी यांचे सल्लागार अली लारीजानी यांचे हे विधान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी (२९ मार्च) दिलेल्या धमकीनंतर आले आहे...

if america attacks iran; we will make nuclear bomb khamenei aide gives a big threat | "अमेरिकेनं हल्ला केला, तर आम्हालाही अणुबॉम्ब...!" इराणची मोठी धमकी

"अमेरिकेनं हल्ला केला, तर आम्हालाही अणुबॉम्ब...!" इराणची मोठी धमकी

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी (२९ मार्च) इराणवर बॉम्ब हल्ला करण्याची धमकी दिली होती. याला आता इराणनेही प्रत्युत्तर दिले आहे. "जर अमेरिका अथवा त्याच्या इतर कोणत्याही मित्र राष्ट्राकडून इराणवर हल्ला केला गेला, तर अशा स्थितीत इराणला अण्वस्त्रे मिळवावी लागतील," असा इशारा इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचे सल्लागार अली लारीजानी यांनी सोमवारी दिला.

एनबीसी न्यूजच्या वृत्तानुसार, खामेनी यांचे सल्लागार अली लारीजानी यांचे हे विधान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी (२९ मार्च) दिलेल्या धमकीनंतर आले आहे. "जर इराणने अमेरिकेसोबत अणु करार केला नाही, तर अमेरिका इराणवर बॉम्बिंग करेल," अशी धमकी ट्रम्प यांनी दिली होती. याशिवाय, याशिवाय, ट्रम्प यांनी इराणला सेकेंडरी टॅरिफअंतर्गत शिक्षा देण्याची धमकीही दिली होती.

यानंतर खामेनी यांनी शपथ घेत, "जर ट्रम्प यांनी आपल्या धमकीनुसार, इस्लामिक रिपब्लिकवर बॉम्ब हल्ला केला, तर आपणही जोरदार प्रत्त्युत्तर देऊ.

अण्वस्त्रांसंदर्भात काय म्हटले खामेनी यांचे सल्लागार? -
सरकारी टाव्हीसोबत बोलताना इराणचे प्रमुख खामेनी यांचे सल्लागार म्हणाले, “अण्वस्त्रांच्या दिशेने आमची वाटचाल सुरू नाही. मात्र, त्यांनी आपल्या इराणच्या अण्वस्त्र मुद्द्यात काही चुकीचे केले, तर आपण इराणला त्याच्या सुरक्षिततेसाठी अण्वस्त्रांकडे वाटचाल करण्यास भाग पाडाल.” ते पुढे म्हणाले, "असे काही करण्याची इराणची इच्छा नाही. मात्र, आमच्याकडे दुसरा पर्यायच उरणार नाही."

तथापि, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वॉशिंग्टनकडून बॉम्बहल्ला करण्याची धमकी दिली होती की, इराणचा शत्रू असलेल्या इस्रायलच्या सहकार्याने हल्ला करण्याची धमकी दिली होती, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Web Title: if america attacks iran; we will make nuclear bomb khamenei aide gives a big threat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.