'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2025 05:46 IST2025-06-22T05:45:30+5:302025-06-22T05:46:00+5:30

Donald Trump nobel prize: आपल्या ‘ट्रुथ सोशल’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिलेल्या पोस्टमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी याबद्दल भूमिका मांडली आहे.

'I won't get Nobel'; Donald Trump expresses regret | 'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत

'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत

न्यूयॉर्क/वॉशिंग्टन : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्ध थांबवले तसेच रशिया-युक्रेन व इस्रायल-इराण संघर्षांमध्ये मध्यस्थी केल्यावरही मला नोबेल शांतता पुरस्कार मिळणार नाही, अशी खंत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली.

आपल्या ‘ट्रुथ सोशल’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिलेल्या पोस्टमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे की, मी कितीही उत्तम काम केले तरी मला शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार कधीच मिळणार नाही. मी कितीही चांगले काम केले तरी मला हा पुरस्कार देण्यात येणार नाही.

ट्रम्प यांची नोबेलसाठी पाकिस्तानकडून शिफारस

भारत-पाकिस्तान संघर्षादरम्यान निर्णायक स्वरूपाचा कथित राजनैतिक हस्तक्षेप केल्याबद्दल ट्रम्प यांना २०२६चा नोबेल शांतता पुरस्कार देण्यात यावा, अशी शिफारस पाकिस्तानने त्या पुरस्कार समितीला केली आहे. 

Web Title: 'I won't get Nobel'; Donald Trump expresses regret