पती भारताकडे; भारतीय महिलेची ऑस्ट्रेलियात हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2024 09:38 IST2024-03-11T09:38:18+5:302024-03-11T09:38:56+5:30

ती मारेकऱ्याला ओळखत असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली.

husband to india indian woman murdered in australia | पती भारताकडे; भारतीय महिलेची ऑस्ट्रेलियात हत्या

पती भारताकडे; भारतीय महिलेची ऑस्ट्रेलियात हत्या

कॅनबेरा : ऑस्ट्रेलियात चैतन्या श्वेता मधगनी या भारतीय महिलेची हत्या करण्यात आली असून, शुक्रवारी व्हिक्टोरिया राज्यातील बकले परिसरात तिचा मृतदेह सापडला. ती मारेकऱ्याला ओळखत असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली.

यासंदर्भात, 'ऑस्ट्रेलिया टुडे'ने पोलिस सूत्रांच्या हवाल्याने वृत्त दिले आहे. तिच्या पतीचे नाव अशोक राज वरिकुप्पाला आहे. चैतन्याच्या हत्येच्या काही तासांपूर्वी तो आपल्या पाच वर्षांच्या मुलासह हैदराबादला रवाना झाला होता. मारेकरी ऑस्ट्रेलियाच्या बाहेर फरारी झाला असण्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे. ५ ते ७ मार्च दरम्यान चैतन्याची हत्या झाल्याचा संशय आहे. 

 

Web Title: husband to india indian woman murdered in australia