"बायको सुंदर आहे म्हणून पतीला बनवलं मंत्री"; ट्रम्प यांच्या 'फ्लर्टिंग'चा व्हिडिओ जगभरात व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2026 15:13 IST2026-01-30T15:04:43+5:302026-01-30T15:13:02+5:30

ओव्हल ऑफिसमध्ये सुरू असलेल्या एका पत्रकार परिषदेत ट्रम्प यांनी आपल्या गृहमंत्र्यांच्या पत्नीसोबत 'फ्लर्ट' केल्याचा प्रकार समोर आला आहे.

"Husband made minister because wife is beautiful"; Trump's 'flirting' video goes viral worldwide | "बायको सुंदर आहे म्हणून पतीला बनवलं मंत्री"; ट्रम्प यांच्या 'फ्लर्टिंग'चा व्हिडिओ जगभरात व्हायरल

"बायको सुंदर आहे म्हणून पतीला बनवलं मंत्री"; ट्रम्प यांच्या 'फ्लर्टिंग'चा व्हिडिओ जगभरात व्हायरल

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे आपल्या बेधडक वक्तव्यांसाठी आणि हटके शैलीसाठी जगभरात ओळखले जातात. मात्र, यावेळी ट्रम्प एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आले आहेत. चक्क ओव्हल ऑफिसमध्ये सुरू असलेल्या एका पत्रकार परिषदेत ट्रम्प यांनी आपल्या गृहमंत्र्यांच्या पत्नीसोबत 'फ्लर्ट' केल्याचा प्रकार समोर आला आहे. "तुमचे सौंदर्य पाहूनच मी तुमच्या पतीला नोकरीवर ठेवले," असे विधान ट्रम्प यांनी सर्वांसमोर केल्याने आता एकच खळबळ उडाली आहे.

नेमकी घटना काय?

शुक्रवारी व्हाईट हाऊसमध्ये अमली पदार्थ आणि व्हेनेझुएलासारख्या गंभीर विषयांवर महत्त्वाची बैठक सुरू होती. यावेळी अमेरिकेचे गृहमंत्री डॉग बर्गम आणि त्यांच्या पत्नी कॅथरीन बर्गम उपस्थित होत्या. चर्चेदरम्यान ट्रम्प यांनी कॅथरीन यांना पत्रकारांशी संवाद साधण्यासाठी निमंत्रित केले. कॅथरीन यांनी पाच मिनिटे आपले मत मांडले. विशेष म्हणजे, त्या बोलत असताना ट्रम्प बाजूला उभं राहून डुलक्या घेताना दिसले.

कॅथरीन यांचे सौंदर्य आणि ट्रम्प यांचे विधान

कॅथरीन यांचे बोलणे संपल्यानंतर ट्रम्प भाषणासाठी उभे राहिले आणि त्यांनी थेट कॅथरीन यांच्या सौंदर्याचे कौतुक सुरू केले. ट्रम्प म्हणाले, "मी एकदा कॅथरीन यांचा घोडेस्वारी करतानाचा व्हिडिओ पाहिला होता आणि विचारले होते की ही महिला कोण आहे? त्यानंतर मला त्यांची माहिती मिळाली." इतक्यावरच न थांबता कॅथरीन यांच्याकडे पाहत ट्रम्प हसून म्हणाले, "कॅथरीन, तुम्ही अतिशय सुंदर आहात. तुमचे सौंदर्य पाहूनच मी डॉग बर्गम यांना माझ्या टीममध्ये सामावून घेतले आहे. अशा लोकांसोबत काम करणे हा माझ्यासाठी सन्मान आहे."

कोण आहेत डॉग बर्गम?

६९ वर्षांचे डॉग बर्गम सध्या अमेरिकेचे गृहमंत्री आहेत. ट्रम्प यांचे जुने मित्र असलेल्या बर्गम यांच्याकडे अमेरिकेच्या अंतर्गत सुरक्षेची महत्त्वाची जबाबदारी आहे. राजकारणात येण्यापूर्वी ते नॉर्थ डकोटाचे गव्हर्नर आणि एक यशस्वी उद्योजक म्हणून ओळखले जात होते. १९८० पासून ट्रम्प आणि बर्गम यांची मैत्री आहे.

वादांची जुनी परंपरा

डोनाल्ड ट्रम्प यांनी अशा प्रकारे फ्लर्ट करण्याची ही पहिलीच वेळ नाही. काही दिवसांपूर्वीच त्यांनी आपली प्रेस सेक्रेटरी कॅरोलिना लीविएट हिच्यासोबतही असाच विनोद केला होता. विमानातून प्रवास करताना विमान हलू लागल्यावर, "मला आधार हवा आहे, पण मी कॅरोलिनाला पकडणार नाही," असे विधान त्यांनी केले होते. ट्रम्प यांच्या या ताज्या व्हिडिओवर आता सोशल मीडियावर मजेशीर कमेंट्सचा पाऊस पडत आहे.

Web Title : ट्रम्प: पत्नी की सुंदरता के लिए मंत्री को काम पर रखा; फ़्लर्टिंग वीडियो वायरल।

Web Summary : ट्रम्प ने मजाक किया कि उन्होंने मंत्री को उनकी पत्नी की सुंदरता के कारण काम पर रखा। एक बैठक के दौरान, उन्होंने मंत्री की पत्नी की प्रशंसा करते हुए कहा कि उनकी सुंदरता ने उनके फैसले को प्रभावित किया। इस टिप्पणी ने विवाद खड़ा कर दिया और यह वायरल हो गया।

Web Title : Trump: I hired minister for wife's beauty; flirting video viral.

Web Summary : Trump joked he hired a minister because of his wife's beauty. During a meeting, he complimented the minister's wife, stating her looks influenced his decision. This comment sparked controversy and went viral.