'जन्नत' मध्ये पती-पत्नी साजरा करत होते हनीमून, रोमान्सनंतर पतीने घेतला पत्नीचा जीव
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2022 14:20 IST2022-07-20T14:19:19+5:302022-07-20T14:20:58+5:30
38 वर्षीय रॉबर्ट डॉसन आपल्या 36 वर्षीय पत्नी क्रिस्टे चेन डॉसनसोबत Fiji च्या एका आयलॅंडवर हनीमून साजरा करण्यासाठी गेला होता.

'जन्नत' मध्ये पती-पत्नी साजरा करत होते हनीमून, रोमान्सनंतर पतीने घेतला पत्नीचा जीव
एका व्यक्तीवर हनीमून दरम्यान आपल्या पत्नीची हत्या करण्याचा आरोप लागला आहे. रिपोर्ट्सनुसार, रोमान्सनंतर व्यक्तीने पत्नीचा जीव घेतला. पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे आणि त्याच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करत चौकशी सुरू केली आहे.
नुकतीच याप्रकरणी कोर्टात सुनावणी झाली होती. ज्यातून अनेक तथ्य समोर आले. nypost.com च्या रिपोर्टनुसार, 38 वर्षीय रॉबर्ट डॉसन आपल्या 36 वर्षीय पत्नी क्रिस्टे चेन डॉसनसोबत Fiji च्या एका आयलॅंडवर हनीमून साजरा करण्यासाठी गेला होता. पण येथील एका हॉटेलच्या रूममध्ये क्रिस्टे चेनचा मृतदेह आढळून आला.
हे कपल अमेरिकेच्या मिसिसीपीमध्ये राहत होतं. कपल हनीमूनसाठी फिजीमध्ये गेलं होतं. या ठिकाणाला आपल्या सुंदरतेमुळे जन्नत म्हटलं जात होतं.
रॉबर्टच्या वकीलांनी सांगितलं की, त्यांना अजून हे समजू शकलेलं नाही की, नवरीचा मृत्यू कशामुळे झाला. पण तिचा मृतदेह एका हॉटेलच्या रूममध्ये आढळून आला. वकिल म्हणाले की, त्यांचा क्लाएंट हत्येप्रकरणी निर्दोष आहे.
तेच चौकशी अधिकाऱ्यांनी सांगितलं की, ही घटना 9 जुलै रोजीची आहे. तर फॉरेन्सिक टीमचे हे नाकारलं होतं. ज्यानंतर कोर्टाकडून DNA सॅम्पल घेण्याचे आदेश देण्याची विनंती करण्यात आली. रॉबर्टच्या वकीलांनी सांगितलं की, 27 जुलैला कोर्टात पुढील सुनावणी होणार आहे.
क्रिस्टे चेन व्यवसायाने एक फार्मासिस्ट होती. तिच्या शेजाऱ्यांनी सांगितलं की, ती तिच्या हनीमून ट्रीपसाठी फार उस्ताही होती. पण ही ट्रीप तिची शेवटची ट्रीप ठरली. क्रिस्टेचा पती रॉबर्ट एका एनजीओमध्ये काम करतो. सध्या हत्येचा आरोप लागल्याने त्याला सस्पेंड करण्यात आलं आहे.