"देव नाही तर एलियन्सनीं मानवाला बनवले, त्यामुळेच आपण…’’, यूएफओलॉजिस्टचा  दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2025 14:57 IST2025-01-18T14:16:50+5:302025-01-18T14:57:25+5:30

Human Created by Alians: मी जे वाचलं आहे आणि जे पाहिलं आहे त्या आधारावर मला वाटतं की, कुणीतरी आम्हाला बनवलं आहे. सर्व प्राचीन संस्कृतींमध्ये आकाशातून येणाऱ्या देवांचा उल्लेख आहे. कदाचित देव हे एलियन्सचंच दुसरं नाव असावं, अशी शक्यताही ते उपस्थित करतात.  

Human Created by Alians: ''It was not God but aliens who created humans, that's why we...", claims UFOlogist | "देव नाही तर एलियन्सनीं मानवाला बनवले, त्यामुळेच आपण…’’, यूएफओलॉजिस्टचा  दावा

"देव नाही तर एलियन्सनीं मानवाला बनवले, त्यामुळेच आपण…’’, यूएफओलॉजिस्टचा  दावा

परग्रहवासी अर्थाल एलियन्सबद्दल शास्त्रज्ञ आणि सर्वसामान्यांना नेहमीच कुतूहल राहिलेलं आहे. दरम्यान, एका यूएफओ एक्स्पर्ट्सनीं मानवाबाबत एक मोठा दावा केला आहे. मार्क क्रिस्टोफर ली यांनी सांगितले की, मानवाने आधीच एलियन्सचा शोध घेतला आहे. कारण आम्ही स्वत:च एलियन्स आहोत. एका प्राचीन एलियन्सच्या जातीनेच मानवांची निर्मिती केली होती. त्यामुळेच आम्ही नैसर्गिक जगातील इतर प्राण्यांपेक्षा पूर्णपणे वेगळे आहोत. मार्कने सांगितले की, बाहेरील अंतराळामधून आलेल्या प्राण्यांनी पृथ्वीवर मिळालेल्या प्राण्यांसोबत छेडछाड करून आमच्या जनुकीय संरचनेमध्ये बदल केला. त्यामुळे आमची प्रजाती ही एवढी वेगळी आणि विकसित झाली.

त्यांनी प्राचीन एलियन्सच्या थिअरीवर चर्चा केली, त्यानुसार मानवाच्या डीएनएमध्ये काही फेरबदल करण्यात आले आहेत. त्यांनी सांगितले की, आम्ही इतर प्राकृतिक जगतापेक्षा खूप वेगळे आहोत, तसेच काही बाबतीत हे खूप वाईट आहे.  कारण आम्ही या पृथ्वीचं नुकसान करतोय, आपल्याला दिसतच आहे. आमच्यामध्ये काही वेगळं आहे. कदाचित या बाबी कुणीतरी आमच्यामध्ये समाविष्ट केलेल्या असाव्यात. दरम्यान क्रिस्टोफर ली यांनी मांडलेल्या या थिअरीला दुजोरा देतील, अशा काही गोष्टीही समोर आहेत. त्यापैकी एक म्हणजे आपल्या डीएनएमधून काही भाग गायब असणं हे आहे.

मार्क यांनी हेही सांगितले की, डीएनएचा शोध करणारे दिवंगत ब्रिटिश जीवशास्त्रज्ञ डॉ. फ्रान्सिस क्रिक पॅनस्पार्मिया च्या सिद्धांतावर विश्वास ठेवतात. हा सिद्धांत सांगतो की, पृथ्वीवर जीवन हे कुठल्या तरी परग्रहावरून आलेल्या बुद्धिमान प्राण्यांनी निर्माण केलं आहे. त्यासाठी ते बायबलसारखे प्राचीन ग्रंथ आणि इजिप्तमधील चित्रलिपींचं उदाहरण देतात. त्यामध्ये आकाशातून आलेल्या प्राण्यांचा उल्लेख आहे. मार्क पुढे सांगतात की हे जाणीवपूर्वक घडलं की चुकीने घडलं असावं, मात्र आम्ही स्वत:च एलियन्स असू शकतो.

यूएफओ आणि यूफोलॉजीचा खूप मोठा भाग हा विश्वास आणि अंदाजावर आधारित आहे. विज्ञान आपल्याला काही मर्यादेपर्यंत उत्तर देऊ शकतं. मात्र इतर केवळ विश्वासावरच आधारित आहे. मी जे वाचलं आहे आणि जे पाहिलं आहे त्या आधारावर मला वाटतं की, कुणीतरी आम्हाला बनवलं आहे. सर्व प्राचीन संस्कृतींमध्ये आकाशातून येणाऱ्या देवांचा उल्लेख आहे. कदाचित देव हे एलियन्सचंच दुसरं नाव असावं, अशी शक्यताही ते उपस्थित करतात.  

Web Title: Human Created by Alians: ''It was not God but aliens who created humans, that's why we...", claims UFOlogist

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.