शहरं
Join us  
Trending Stories
1
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
2
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
3
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
4
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
5
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
6
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
7
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
8
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
9
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
11
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
12
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
13
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
14
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
15
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
16
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
17
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
18
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
19
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
20
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
Daily Top 2Weekly Top 5

युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2025 18:52 IST

Blackout in Spain Portugal Europe: सध्या यामागील कारण शोधले जात आहे. हा सायबर हल्ला असू शकतो, असे मानले जात आहे.

Blackout in Spain Portugal Europe: अचानक युरोपातील अनेक देशांमध्ये वीजेचे गंभीर संकट निर्माण झाले आहे. स्पेन आणि पोर्तुगालसह अनेक भागात मोठ्या प्रमाणात वीजपुरवठा खंडित झाला, ज्यामुळे हवाई सेवांपासून ते मेट्रोसारख्या विविध वाहतुकीच्या सोयींवर परिणाम झाला आहे. सुरुवातीला माद्रिद ते लिस्बन पर्यंतचा मोठा भाग अंधारात होता. या आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी दोन्ही देशांनी तात्काळ प्रोटोकॉल लागू केला आहे. सध्या यामागील कारण शोधले जात आहे. हा सायबर हल्ला असू शकतो, असे मानले जात आहे.

स्पेनच्या राष्ट्रीय ग्रिड ऑपरेटर 'रेड इलेक्ट्रिका'ने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, देशभरातील वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी क्षेत्रातील कंपन्यांच्या सहकार्याने अनेक ठोस पावले उचलली जात आहेत. दरम्यान, पोर्तुगालच्या ग्रिड ऑपरेटर 'ई-रेड्स' ने सांगितले की युरोपियन पॉवर ग्रिडमधील समस्येमुळे हे संकट उद्भवले आहे. सुरुवातीच्या तपासात, व्होल्टेज असंतुलन हे वीज प्रणाली पूर्णपणे कोलमडण्याचे मुख्य कारण असल्याचे मानले जात आहे.

'ब्लॅकआउट'मुळे सारंकाही ठप्प

या ब्लॅकआउटमुळे ट्रॅफिक लाईट बंद पडले आणि मेट्रो सेवा थांबल्या, ज्यामुळे रस्त्यांवर गोंधळ उडाला. रुग्णालयांमधील अत्यावश्यक सेवा बॅकअप जनरेटरच्या मदतीने चालवल्या जात आहेत, परंतु अधिकाऱ्यांनी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना संगणक बंद करण्याचे आणि वीज वाचवण्यासाठी इतर उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. सध्या तरी हे संकट किती काळ राहील हे स्पष्ट नाही. परिस्थिती हाताळण्यासाठी स्पेनमध्ये एक आपत्ती व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आली आहे.

सायबर हल्ल्याची शक्यता

स्पॅनिश अधिकाऱ्यांनी म्हटले आहे की, ब्लॅकआउटचे कारण आतापर्यंत सायबर हल्ला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. याची सखोल चौकशी केली जात आहे. याआधीही युरोपमध्ये किरकोळ तांत्रिक बिघाडांमुळे मोठे ब्लॅकआउट झाले आहेत. २००३ मध्ये, स्वित्झर्लंडमध्ये एका झाडामुळे वीज तार तुटल्याने संपूर्ण इटली अंधारात बुडाली होती. त्यामुळे यावेळीही तांत्रिक समस्या किंवा सायबर हल्ला या दोन्ही शक्यता लक्षात घेऊन तपास केला जात आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता, स्पॅनिश प्रशासनाने सर्वसामान्यांना आवाहन केले आहे की त्यांनी आपत्कालीन सेवांना अनावश्यक कॉल करू नयेत, कारण टेलिफोन सेंटर आधीच कॉलने भरलेले आहेत. युरोपियन कमिशनने गेल्या अनेक वर्षांपासून देशांमधील ऊर्जा प्रणालीच्या चांगल्या एकत्रीकरणाच्या गरजेवर भर दिला आहे, परंतु प्रगती मंदावली आहे. सध्याच्या संकटाने युरोपला पुन्हा एकदा या दिशेने गांभीर्याने विचार करण्यास भाग पाडले आहे.

टॅग्स :Portugalपोर्तुगालPower Shutdownभारनियमनcyber crimeसायबर क्राइमMetroमेट्रोairplaneविमान