Howard Lutnick : "मी भारताचा खूप मोठा फॅन"; भारत-अमेरिका व्यापार कराराबद्दल हॉवर्ड लॅटनिक यांनी दिली गुड न्यूज
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 09:37 IST2025-06-03T09:36:54+5:302025-06-03T09:37:40+5:30
Howard Lutnick : यूएस इंडिया स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप फोरममध्ये अमेरिकेचे वाणिज्य सचिव हॉवर्ड लॅटनिक यांनी भारतासोबतच्या संबंधांबद्दल अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या.

Howard Lutnick : "मी भारताचा खूप मोठा फॅन"; भारत-अमेरिका व्यापार कराराबद्दल हॉवर्ड लॅटनिक यांनी दिली गुड न्यूज
वॉशिंग्टन डीसीमध्ये झालेल्या यूएस इंडिया स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप फोरममध्ये अमेरिकेचे वाणिज्य सचिव हॉवर्ड लॅटनिक यांनी भारतासोबतच्या संबंधांबद्दल अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या. त्यांनी भारताचं कौतुक केलं. तसेच भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच व्यापार करार होण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
हॉवर्ड लॅटनिक म्हणाले, "मी भारताचा खूप मोठा फॅन आहे आणि भारत सरकारमधील लोकांनाही हे माहित आहे. माझे एक जवळचे मित्र निकेश अरोरा भारतीय आहेत. मी जेव्हा भारतात जायचो तेव्हा आम्ही घरी पार्टी करायचो, क्रिकेट खेळायचो आणि खूप मजा करायचो. भारतात घालवलेला वेळ माझ्यासाठी एक खास अनुभव आहे."
#WATCH | At the US-India Strategic Partnership Forum in Washington, DC, US Secretary of Commerce, Howard Lutnick says, "...I am a great fan of India, and even the people in the government know that that's true."
— ANI (@ANI) June 3, 2025
He says, "One of my best friends, Nikesh Aurora, is Indian... When… pic.twitter.com/QCP82Na34n
"आजच्या जगात मोदी आणि ट्रम्प यांच्यासारखे नेते दुर्मिळ"
लॅटनिक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील संबंधांवरही भाष्य केलं. "डोनाल्ड ट्रम्प हे आपल्या प्रशासनातील एकमेव नेते आहेत ज्यांना संपूर्ण अमेरिकेतील लोकांनी निवडून दिलं आहे, जसा नरेंद्र मोदींना भारतात संपूर्ण देशाचा जनादेश मिळाला आहे. जगात असे फार कमी नेते आहेत ज्यांना त्यांच्या देशातील लोकांनी इतक्या मोठ्या प्रमाणात निवडून दिलं आहे. मोदी आणि ट्रम्प यांच्यासारखे नेते दुर्मिळ आहेत. म्हणूनच त्यांचे परस्पर संबंध खूप मजबूत आणि खास आहेत" असं सांगितलं.
लवकरच होऊ शकतो करार
"ज्या देशांनी जलद पावलं उचलली आहेत, त्यांच्यासोबत चांगले करार होतात. मला वाटतं की, भारतही तेच करत आहे आणि मी त्यांचं कौतुक करतो. पूर्वी असे करार होण्यासाठी दोन-तीन वर्षे लागायची, परंतु आता आम्ही ते एका महिन्यात पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहोत. हे देशांमधील सामान्य व्यापार प्रक्रियेपेक्षा वेगळे आहे. मला वाटतं की, आम्ही खूप चांगल्या स्थितीत आहोत आणि अमेरिका आणि भारत यांच्यात लवकरच व्यापार करार होऊ शकतो, कारण आम्हाला असा मार्ग सापडला आहे जो दोन्ही देशांसाठी फायदेशीर आहे" असंही हॉवर्ड लॅटनिक यांनी म्हटलं आहे.