रशिया कसं थांबवेल युक्रेन युद्ध? ट्रम्प यांनी UNGA मध्ये सांगितला अमेरिकेचा प्लॅन; पुतिन यांचं टेन्शन वाढणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2025 22:31 IST2025-09-23T22:30:49+5:302025-09-23T22:31:14+5:30

यामुळे व्लादिमीर पुतिन यांचे टेन्शन वाढू शकते. महत्वाचे म्हणजे, डोनाल्ड ट्रम्प यांनी असा निर्मय घेतचाल तर, रशियाबरोबरच युरोपीय देशांनाही याचा फटका बसू शकतो.

How will Russia stop the Ukraine war Trump told America's plan in the UNGA Putin's tension will increase! | रशिया कसं थांबवेल युक्रेन युद्ध? ट्रम्प यांनी UNGA मध्ये सांगितला अमेरिकेचा प्लॅन; पुतिन यांचं टेन्शन वाढणार!

रशिया कसं थांबवेल युक्रेन युद्ध? ट्रम्प यांनी UNGA मध्ये सांगितला अमेरिकेचा प्लॅन; पुतिन यांचं टेन्शन वाढणार!


अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी संयुक्त राष्ट्र महासभेच्या बैठकीत रशिया–युक्रेन युद्धासंदर्भात कठोर भूमिका मांडत, हे युद्ध थांबवण्यासंदर्भात अमेरिकेचा प्लॅनच समोर ठेवला आहे. रशियाने युद्ध थांबवले नाही तर अमेरिकेकडून मोठ्या प्रमाणावर टॅरिफ लादले जाईल, असा थेट इशाराच ट्रम्प यांनी रशियाला दिला आहे. यामुळे व्लादिमीर पुतिन यांचे टेन्शन वाढू शकते. महत्वाचे म्हणजे, डोनाल्ड ट्रम्प यांनी असा निर्मय घेतचाल तर, रशियाबरोबरच युरोपीय देशांनाही याचा फटका बसू शकतो.

रशियाला टॅरिफची धमकी
ट्रम्प म्हणाले, "रशिया युद्ध थांबवण्यास तयार नसेल, तर अमेरिका मोठ्या प्रमाणावर टॅरिफ लावण्यास तयार आहे. यामुळे युद्ध लगेच थांबू शकेल. मात्र यामुळे युरोपलाही मोठा फटका बसू शककतो. यामुळे येथे उपस्थित असलेल्या देशांनीही युद्ध थांबविण्याच्या मोहिमेत आमच्यासोबत यायला हवे."

डोनाल्ड ट्रम्प यांनी नाटो देशांनाही सोडलं नाही - 
यावेळी ट्रम्प यांनी नाटो देशांवरही टीका केली. ते म्हणाले, 'नाटो देशांनीही रशियन ऊर्जा आणि त्याच्या उत्पादनांवर फार निर्बंध घातलेले नाहीत. ते स्वतःविरोधातच युद्धाला फंडिग करत आहेत. युरोपियन संघ रशियाशी लढत आहेत आणि त्याच्याकडूनच तेल–गॅस खरेदी करत आहेत, हे लज्जास्पद आहे."

ट्रम्प पुढे म्हणाले, जर युद्ध थांबविण्यासाठी कोणताही करार झाला नाही, तर अमेरिका रशियावर टॅरिफ लावण्यास तयार आहे. तसेच, युरोपियन देशांनीही असेच पाऊल उचलून अमेरिकेला साथ द्यायला हवी, असेही ट्रम्प म्हणाले.

तत्पूर्वी, भाषणाच्या सुरुवातीलाच ट्रम्प यांनी आपल्या कार्यकाळातील पहिल्या आठ महिन्यांतील काही "मोठ्या कामांचा" पाढा वाचला. दरम्यान, सध्या अमेरिका "सुवर्णयुगात" असल्याचा दावाही त्यांनी केला. तसेच, ट्रम्प  यांनी परराष्ट्र धोरनाशी संंबधित कुठल्याही कामात, मदद न केल्याबद्दल संघटनेवरही टीका केली.
 

Web Title: How will Russia stop the Ukraine war Trump told America's plan in the UNGA Putin's tension will increase!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.