येमेनमध्ये इस्रायलच्या हवाई हल्ल्यात हुथी सरकारचे पंतप्रधान अहमद अल-राहवी ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2025 22:21 IST2025-08-30T22:12:11+5:302025-08-30T22:21:53+5:30
येमेनची राजधानी साना येथे इस्रायली हवाई हल्ल्यात हुथी सरकारचे पंतप्रधान अहमद अल-राहवी यांचा मृत्यू झाला. हुथी संघटनेने याबाबत माहिती दिली. गाझावरील इस्रायली कारवाईच्या निषेधार्थ इराण समर्थित हुथी इस्रायलवर हल्ला करत आहेत.

येमेनमध्ये इस्रायलच्या हवाई हल्ल्यात हुथी सरकारचे पंतप्रधान अहमद अल-राहवी ठार
गुरुवारी राजधानी साना येथे इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यात येमेनचे पंतप्रधान अहमद अल-राहवी यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्यासह अनेक मंत्री आणि अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला. हुथी संघटनेने त्यांच्या मृत्यूची पुष्टी केली.
येमेनचा मोठा भाग इराण समर्थित हुथी संघटनेच्या ताब्यात आहे. गाझावरील इस्रायली कारवाईच्या निषेधार्थ ही संघटना इस्रायलवर क्षेपणास्त्रे आणि ड्रोन डागत आहे. या हल्ल्यांमुळे इस्रायलचे अनेक वेळा नुकसान झाले आहे आणि अनेक लोक जखमीही झाले आहेत पण बहुतेक क्षेपणास्त्रे हवेतच नष्ट झाली.
क्वाड शिखर परिषदेसाठी डोनाल्ड ट्रम्प भारतात येणार? समोर आली मोठी माहिती...
लष्करप्रमुखाचाही मृत्यू झाल्याची माहिती
'गुरुवारी झालेल्या कारवाईत येमेनचे संरक्षणमंत्री आणि लष्करप्रमुख मारले गेल्याचे संकेत आहेत. इस्रायली लढाऊ विमानांनी सना येथील त्या ठिकाणी हल्ला केला जिथे हुथी सरकारचे प्रमुख नेते जमले होते. पण हुथी संघटनेने या हल्ल्यात झालेल्या नुकसानीबाबत कोणतेही विधान दिलेले नाही.
हुथी सरकारचे पंतप्रधान अहमद अल-राहवी यांचा मृत्यू
हल्ल्याच्या दोन दिवसांनंतर शनिवारी हुथींनी एक निवेदन जारी केले. अल-राहवी ऑगस्ट २०२४ पासून येमेनच्या हुथी सरकारमध्ये पंतप्रधान होते. त्यांच्यावर हल्ला झाला तेव्हा ते सरकारच्या कामकाजाचा आढावा घेत होते. हुथी हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून इस्रायलने या आठवड्यात येमेनवर अनेक हवाई हल्ले केले.
नोव्हेंबर २०२३ पासून हमासच्या समर्थनार्थ हौथी संघटना लाल समुद्रातून जाणाऱ्या जहाजांवर हल्ले करत होती, पण या वर्षी मे महिन्यात अमेरिकेशी झालेल्या करारानंतर हौथींनी हल्ले थांबवले. यानंतर अमेरिकेने येमेनवरील हल्लेही थांबवले.