शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

Afghanistan Crisis: भयावह! तालिबानच्या हाती अमेरिका, रशियाची शस्त्रास्त्रे; संख्या काही देशांएवढी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2021 11:06 IST

Taliban got Dangerous weapons from Afghanistan: पाकिस्तानला ट्रकचे ट्रक भरून उगाच शस्त्रे माघारी दिली नाहीत, तालिबानच्या हाती अद्ययावत शस्त्रांचे साठे लागले आहेत. जे अफगान सैन्य टाकून पळाले होते. 

काबुल: तालिबान्यांनी (Taliban) अफगानिस्तानावर (Afghanistan) कब्जा केला. यानंतर ज्याच्या त्याच्या नजरेतून तालिबानकडे पाहिले जात आहे. चीन, रशिया, पाकिस्तान, बांग्लादेश सारख्या देशांनी तालिबानची बाजू घेतली आहे, तर भारत, अमेरिका, ब्रिटन सारख्या देशांनी तालिबान विरोधी बाजू घेतली आहे. बरेचशे असे देश आहेत जे सावध भूमिका घेत आहेत. तालिबानच्या ताब्यात एक अजिंक्य प्रांत सोडता उर्वरित अफगानिस्तान ताब्यात आले आहे. यापेक्षा खळबळजनक बाब म्हणजे, तालिबानच्या हाती अमेरिका, रशियाच्या अद्ययावत शस्त्रास्त्रांचे (weapons) भांडार लागले आहे. (Afghanistan gives Taliban access to several weapons including guns, ammunition, helicopters and more)

Afghanistan: हिम्मत लागते! अफगानिस्तान अजून पडलेले नाही; एक प्रांत अजूनही लढतोय

 सोमवारपासून अफगानिस्तानचा चेहराच बदलला आहे. तालिबानी रस्त्यावर फिरू लागले असून त्यांना विरोध करणाऱ्यांचा आवाज दाबला जात आहे. झेंड्यावरून प्रदर्शन करणाऱ्या लोकांवर तालिबानींनी गोळीबार केला होता. धक्कादायक बाब म्हणजे मिशन पूर्ण होताच शस्त्रांनी भरलेले ट्रकचे ट्रक पाकिसातानात पाठविण्यात आले आहेत. ही शस्त्रे तालिबानींसाठी पाकिस्तानने पुरविली होती. परंतू, या मागे आणखी एक कारण समोर आले आहे. तालिबान दहशतवाद्यांच्या हाती अमेरिका, रशिया आणि युएनने अफगानिस्तान सैन्याला दिलेली शस्त्रे लागली आहेत. या शस्त्रास्त्रांची किंमत अब्जावधी डॉलर असून ही न मोजता येणारी शस्त्रे पाहता अनेक देशांच्या बरोबरीने तालिबानची ताकद तयार झाली आहे. ही ताकद रातोरात मिळाल्याने तालिबान प्रबळ झाला आहे. महत्वाची बाब म्हणजे तालिबानकडे आता अफगान सैन्यातील प्रशिक्षित जवान, पायलट देखील आहेत. जिवाच्या भितीने ते देखील तालिबानला सामिल झाले आहेत.

Afghanistan: अफगानिस्तान एकेकाळी भारताचा भाग होता; महाराजा चंद्रगुप्त मौर्य यांनी 500 हत्तींच्या मदतीने जिंकलेला

अफगानिस्तानात सत्तेत आल्यामुळे नाही तर सैन्याने अत्यंत घातक शस्त्रे तिथेच टाकून पळ काढल्याने ठिकठिकाणचे मोठमोठे शस्त्र भांडार तालिबानच्या हाती लागले आहेत. यामध्ये लष्करी हेलिकॉप्टर, रणगाडे, बुलेटप्रूफ गाड्या, तोफा असलेली वाहने एवढेच नाही तर रशियन हेलिकॉप्टर उडविणारे पायलट देखील तालिबानकडे आहेत. अमेरिकेचे Mi-24 अटॅक चॉपर्स, UH-60 ब्लॅकहॉक, रशियाचे Mi-8/17 ट्रांसपोर्ट आणि ब्राझीलचे A-29 सुपर टुकानो लाइट फाइटर्स ही लढाऊ विमाने तालिबानच्या ताब्यात आहेत. 

Afghanistan: अमेरिकेला एकच चूक नडली; तालिबानच्या मास्टरमाईंड बरादरला 2018 मध्ये सोडले तिथेच फसले

हवाई हल्ले परतवून लावण्यासाठीचे असंख्य Humvees, आर्मी पिकअप ट्रक, कंटेनर्स मिळाले आहेत. तालिबानने अफगानिस्तान सैन्याचे तळदेखील ताब्यात घेतले आहेत. यामध्ये असंख्य बंदुका, करोडो गोळ्या आणि अज्ञात संख्येने शस्त्रास्त्रे आहेत. लढाई सोडून पळालेल्या सैन्याने मागे हजारो ग्रेनेड, रॉकेट आणि अन्य सामुग्री सोडली आहे. रशियाचे T-55/62 टँक, 50 हून अधिक अमेरिकी M-1117 टँक आता या दहशतवाद्यांच्या ताब्यात आहेत. यामुळे अमेरिकेने चिंता व्यक्त केली आहे.  

टॅग्स :TalibanतालिबानAfghanistanअफगाणिस्तानAmericaअमेरिकाrussiaरशिया