शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
4
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
5
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
6
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
7
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
8
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
9
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
10
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
11
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
12
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
13
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
14
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
15
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
16
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
17
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
18
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
19
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
20
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
Daily Top 2Weekly Top 5

हाँगकाँग : पुन्हा लोकशाहीचे वेध

By admin | Updated: June 16, 2015 02:35 IST

हाँगकाँगमध्ये नऊ महिन्यांपूर्वी झालेल्या अंब्रेला रिव्हॉल्युशनमध्ये नवा अध्याय सुरू झाला आहे. चीन सरकारने आणलेल्या नव्या निवडणूक सुधारणा

हाँगकाँग : हाँगकाँगमध्ये नऊ महिन्यांपूर्वी झालेल्या अंब्रेला रिव्हॉल्युशनमध्ये नवा अध्याय सुरू झाला आहे. चीन सरकारने आणलेल्या नव्या निवडणूक सुधारणा प्रस्तावाला हाँगकाँगवासीयांनी व विशेषत: लोकशाहीवादी आंदोलकांनी विरोध दर्शविला आहे. रविवारी व्हिक्टोरिया पार्कमध्ये हजारो नागरिकांनी पिवळ्या छत्र्या घेऊन सरकारच्या सुधारणा प्रस्तावाचा तीव्र निषेध केला.हाँगकाँगचे प्रशासन चालविण्यासाठी उच्चपदस्थ नेते यापूर्वी सरळ बीजिंगशी जवळीक असणाऱ्या एका समितीद्वारे निवडले जात असत. आता हाँगकाँगवासीयांना मतदानाद्वारे आपले नेते निवडण्याचा अधिकार मिळणार आहे; मात्र हे उमेदवार पुन्हा तशाच समितीने छाननी केलेले असावेत, असा प्रस्ताव आहे; पण हाँगकाँगवासीयांनी याला प्रचंड विरोध केला असून, आम्हाला पूर्ण लोकशाही पद्धतीने आमचे नेतृत्व निवडायचे आहे, अशी त्यांची भूमिका आहे. १९९७ साली हाँगकाँग जेव्हा युनायटेड किंग्डमने चीनकडे सुपूर्द केले तेव्हा त्याची स्वायत्तता जपली जाईल असे आश्वासन देण्यात आले होते; मात्र हाँगकाँगवासीय कौन्सिलमधील ७० पैकी केवळ ३५ सदस्यच निवडू शकतात. बाकीचे सदस्य कॉर्पोेरेट आणि बीजिंगशी जवळीक असणाऱ्या लॉबी, गटांकडून नेमले जातात; पण कौन्सिलमधील सर्व सदस्य सरळ मतदानाद्वारे निवडले जावेत अशी मागणी हाँगकाँगच्या नागरिकांनी केली आहे. नऊ महिन्यांपूर्वी अंब्रेला रिव्होल्युशन या आंदोलनात नागरिकांनी चिवटपणे आपली मागणी लावून धरली होती. (वृत्तसंस्था)