शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
2
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
3
Lenskartच्या आयपीओची ग्रे मार्केटमध्ये धमाकेदार एन्ट्री; प्राईज बँड ते लिस्टिंगपर्यंत जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
4
वैभव खेडेकरांना मोठा धक्का; भाजपात गेलेले अनेक पदाधिकारी महिनाभरातच मनसेत परतले, गड राखणार?
5
तुमचा आजचा मासिक खर्च ३०,००० रुपये असेल, तर निवृत्तीनंतर ही जीवनशैली जगायला किती पैसे लागतील?
6
पोस्टाच्या 'या' स्कीममध्ये जमा करा ₹५०००; मॅच्युरिटीवर मिळेल १६ लाखांपेक्षा अधिक रक्कम, जाणून घ्या
7
‘अमेरिकेत जाण्यासाठी ३५ लाख रुपये खर्च केले, २५ तास बेड्या घालून परत धाडले’, तरुणाने मांडली व्यथा
8
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
9
धक्कादायक! २५ वर्षीय मराठी अभिनेत्याची आत्महत्या, सिनेमाचं रिलीज तोंडावर असताना संपवलं आयुष्य
10
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
11
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
12
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
13
चातुर्मास कधी संपणार? पाहा, विष्णुप्रबोधोत्सव, कार्तिकी एकादशीचे महत्त्व, महात्म्य, मान्यता
14
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
15
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
16
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट
17
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
18
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
19
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
20
टीव्हीवरचं लोकप्रिय कपल, लग्नाच्या १४ वर्षांनी जय भानुशाली-माही विजचा घटस्फोट?

२००१ मध्ये पहिल्यांदा सापडला होता HMPV, २४ वर्षांनंतरही विकसित झालेली नाही प्रतिबंधात्मक लस

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2025 16:08 IST

HMPV Virus Update: २००१ मध्ये एचएमपी हा विषाणू पहिल्यांदा सापडला होता. तेव्हापासून आतापर्यंत त्याला प्रतिबंध करणं आव्हानात्मक ठरत आहे. या विषाणूविरोधात अद्याप कुठलीही प्रतिबंधात्मक लस किंवा अँटीव्हायरल उपचार विकसित करता आलेले नाहीत.  

मागच्या काही दिवसांपासून चीनमध्ये धुमाकूळ घालत असलेल्या एचएमपी विषाणूचा आता भारतातही शिरकाव झाला आहे. कर्नाटकमध्ये या विषाणूचे दोन रुग्ण सापडले आहेत. येथे दोन छोट्या मुलींना या विषाणूचा संसर्ग झाल्याचं समोर आलं आहे. तर गुजरातमध्येही एचएमपीव्हीचा एक रुग्ण सापडला आहे. त्या पार्श्वभूमीवर सरकारी यंत्रणांनी खबरदारीच्या उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, २००१ मध्ये पहिला रुग्ण आढळला होता. मात्र २४ वर्ष उलटून गेल्यानंतरही या विषाणूविरोधात प्रतिबंधात्मक लस तयार होऊ शकलेली नाही. 

२००१ मध्ये एचएमपी हा विषाणू पहिल्यांदा सापडला होता. तेव्हापासून आतापर्यंत त्याला प्रतिबंध करणं आव्हानात्मक ठरत आहे. या विषाणूविरोधात अद्याप कुठलीही प्रतिबंधात्मक लस किंवा अँटीव्हायरल उपचार विकसित करता आलेले नाहीत.  जवळपास २५ वर्षं लोटल आली तरी एचएमपीव्हीला जागतिक पातळीवर पायबंद घालणं हे एक आव्हान बनून राहिलं आहे. मात्र या विषाणूविरोधात कुठला प्रभावी उपचार उपलब्ध नसला तरी गंभीर रुग्णांवर उपचार करताना ऑक्सिजन थेरेपी, कॉर्टिकोस्टेरॉईड यांचा वापर करून इतर उपचार करता येतात.

या विषाणूच्या संसर्गाची लक्षणे दिसणाऱ्या रुग्णांना रुग्णालयात दाखल करणं आवश्यक असतं. एचएमपीव्हीचा फैलाव रोखण्यासाठी गर्दी असलेल्या भागात कायम मास्कचा वापर करणे आणि वारंवार  हात धुण्यासारखे उपाय करण्याची शिफारस करण्यात येते.

दरम्यान, चीनमध्ये एचएमपीव्हीच्या रुग्णांची संख्या वाढल्या कारणाने भारतात खबरदारी घेतली जात आहे, एनसीडीसीकडून थंडीच्या काळात उदभवणाऱ्या श्वसनासंबंधीच्या आजारांवर लक्ष ठेवलं जात आहे. तसेच भारतीय अधिकारी हे डब्ल्यूएचओसह जागतिक आरोग्य यंत्रणांच्या सातत्याने संपर्कात आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.  

टॅग्स :HMPV Virusह्युमन मेटापन्यूमोव्हायरसHealthआरोग्यInternationalआंतरराष्ट्रीय