शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

कधीकाळी 75-80 टक्के ख्रिश्चन लोकसंख्या असलेला लेबनॉन मुस्लिम देश कसा बनला? वाचा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2024 14:50 IST

1920 मध्ये लेबनॉनमध्ये सुमारे 75-80 टक्के ख्रिश्चन होते.

History Of Lebanon : इस्रायल आणि हिजबुल्ला यांच्यात सुरू असलेला संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. इस्रायल सातत्याने लेबनॉनमधील हिजबुल्लाच्या ठिकाणांवर हवाई हल्ले करत आहे. पण, याचा परिणाम लेबनॉनमध्ये राहणाऱ्या सर्वसामान्यांना भोगावा लागत आहे. इस्रायलच्या हल्ल्यांमध्ये हिजबुल्लाह दहशतवाद्यांव्यतिरिक्त अनेक सामान्य लोकही मारले जात आहेत. 

इस्रायलने शुक्रवारी लेबनॉनमध्ये केलेल्या बॉम्बहल्ल्यात हिजबुल्लाहचा टॉप कमांडर हसन नसराल्लाह मारला गेला. हसन नसराल्लाह याच्या मृत्यूनंतर हा संघर्ष संपण्याची शक्यता वर्तवली जात होती, पण त्याच्या मृत्यूनंतर हा संघर्ष आणखी तीव्र झाला आहे. लेबनॉनवर इस्रायलचा बॉम्बवर्षाव अद्याप सुरुच आहे. हा संघर्ष कधी थांबणार, हे कुणालाच माहित नाही. दरम्यान, इस्रायल आणि लेबनॉनमधील हिजबुल्ला यांच्यात संघर्षाचे नेमके कारण काय? 

इस्रायल-हिजबुल्ला संघर्षाचे कारणइस्रायल आणि पॅलेस्टाईनचा अनेक वर्षांपासून संघर्ष सुरू आहे. हिजबुल्ला पॅलेस्टाईन समर्थक असल्यामुळे इस्रायलला आपला शत्रू मानते. तसेच, हिजबुल्ला आमच्या सीमेवर सतत हल्ले करत असल्याचा आरोप इस्रायल सुरुवातीपासून करत आहे. पण, या संघर्षाचे मूळ दोन्ही देशांचे धर्म आहे. या दोन्ही देशांना आपापल्या धर्माचे श्रेष्ठत्व सिद्ध करायचे आहे. इस्रायल ज्यू धर्मासाठी लढण्याचा दावा करतो, तर हिजबुल्ला इस्लामसाठी लढतोय.

१२ दिवसांत हिजबुल्लाहचा गेम फिनिश..पेजर हल्ला ते बंकर स्फोटापर्यंत इस्त्रायलचा तांडव

धर्माच्या वर्चस्वासाठी संघर्ष इतिहास पाहिला तर आपल्याला असे दिसून येते की, कोणत्या धर्माने वर्चस्व गाजवावे, यासाठी गेली 100 वर्षे संघर्ष सुरू आहे. 1920 मध्ये लेबनॉनमध्ये सुमारे 75-80 टक्के ख्रिश्चन होते. पण फ्रान्सपासून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लोकसंख्येची रचना बदलू लागली. पॅलेस्टाईन आणि सीरियातून मोठ्या संख्येने निर्वासित देशात येऊ लागले. सत्तेच्या वाटणीवरून ख्रिश्चन, सुन्नी मुस्लिम आणि शिया यांच्यात परस्पर संघर्ष होता.

गृहयुद्धामुळे लेबनॉनची रचना बदललीसत्तेवर वर्चस्वासाठी 1975 ते 1990 पर्यंत देशात गृहयुद्ध झाले. या गृहयुद्धाने लेबनॉनला पूर्णपणे बदलून टाकले. ख्रिश्चन आणि मुस्लिम वर्चस्वावरील या गृहयुद्धात एक लाख ख्रिश्चन मारले गेले आणि सुमारे 10 लाख ख्रिश्चन देश सोडून पळाले. देशात गृहयुद्ध सुरू झाले, तेव्हा 50 टक्के ख्रिश्चन आणि सुमारे 37 टक्के मुस्लिम होते. गृहयुद्ध संपल्यानंतर 47 टक्के ख्रिश्चन आणि 53 टक्के मुस्लिम झाले. या क्षणी लेबनॉनमध्ये ख्रिश्चनांची सध्याची संख्या सुमारे 15 टक्के आहे, तर 85 टक्के मुस्लिम आहेत.

टॅग्स :Israelइस्रायलInternationalआंतरराष्ट्रीयwarयुद्ध