शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 17:54 IST

भारतीय अंतराळवीर, ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांनी 'ड्रॅगन' अंतराळयानातून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक (ISS) गाठले आहे.

आज भारतासाठी एक ऐतिहासिक क्षण असून, भारतीय अंतराळवीर, ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांनी 'ड्रॅगन' अंतराळयानातून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक (ISS) गाठले आहे. भारताच्या अंतराळ कार्यक्रमासाठी हे एक महत्त्वाचे पाऊल असून, शुभांशू शुक्ला आता १४ दिवस अवकाशात संशोधन करणार आहेत.

शुभांशू शुक्ला अंतराळातून पाठवलेला त्यांचा पहिला व्हिडिओ मेसेजही समोर आला आहे. त्यात ते हसून म्हणाले की, "अंतरिक्षातून नमस्कार! एका लहान मुलाप्रमाणे मी अंतराळात चालणे-फिरणे आणि खाणे-पिणे शिकत आहे. मी खूप झोपत आहे." त्यांचे हे शब्द भारताच्या या महत्त्वाकांक्षी प्रवासाची साधेपणाने पण दृढपणे ग्वाही देत आहेत.

राकेश शर्मा यांच्यानंतर 'भारताचा दुसरा सुपुत्र' अवकाशात!भारतीय हवाई दलाने या क्षणाचे महत्त्व अधोरेखित करत म्हटले आहे की, ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला एका ऐतिहासिक प्रवासावर निघाले आहेत. स्क्वाड्रन लीडर राकेश शर्मा यांनी ४१ वर्षांपूर्वी (१९८४ मध्ये) अवकाशात तिरंगा फडकवला होता. त्यानंतर आता ४१ वर्षांनी पुन्हा एकदा भारताचा सुपुत्र अंतराळात पोहोचला आहे. हे केवळ एक मिशन नसून, भारताच्या वाढत्या अंतराळ सामर्थ्याचे प्रतीक आहे.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही या घटनेबद्दल आनंद व्यक्त केला. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले, "भारतसह ४ देशांच्या अंतराळवीरांना घेऊन जाणारे हे अंतराळ मिशन एक मैलाचा दगड ठरेल. देशाला त्यांच्यावर गर्व आहे. त्यांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना खूप खूप शुभेच्छा."

ISS वर 'उत्स्फूर्त' स्वागत आणि Axiom-4 मिशन!२८ तासांच्या रोमांचक प्रवासानंतर, शुभांशु शुक्ला आणि त्यांच्या टीमचे ISS वर सध्या वास्तव्यास असलेल्या सात अंतराळवीरांनी (ज्यामध्ये तीन नासाचे, एक जपानचा आणि तीन रशियन अंतराळवीर आहेत) उत्साहात आणि आपुलकीने स्वागत केले.

हे मिशन Axiom-4 चा भाग आहे, जे ह्यूस्टन (अमेरिका) येथील Axiom Space द्वारे आयोजित करण्यात आले आहे. या मोहिमेअंतर्गत, शुभांशु शुक्ला आणि त्यांची टीम पुढील १४ दिवस ISSवर विविध वैज्ञानिक प्रयोग करतील.

इतिहास घडवणारी आंतरराष्ट्रीय टीमया Axiom-4 मिशनची कमान पेगी व्हिटसन यांच्या हातात आहे. त्या नासाच्या माजी अंतराळवीर असून, आता Axiom Space मध्ये मानव अंतराळ उड्डाण विभागाच्या संचालक आहेत. त्यांच्यासोबत टीममध्ये शुभांशु शुक्ला (भारत), स्लावोश उझनांस्की-विशनेव्स्की (पोलंड) आणि तिबोर कापू (हंगेरी) यांचा समावेश आहे.

विशेष म्हणजे, भारत, पोलंड आणि हंगेरी या तिन्ही देशांसाठी गेल्या चार दशकांनंतरची ही पहिलीच मानवी अंतराळ मोहीम आहे आणि ISS पर्यंत पोहोचण्याचे त्यांचे हे पहिलेच मिशन आहे. शुभांशु शुक्ला यांच्या या ऐतिहासिक प्रवासाने भारताच्या अंतराळ इतिहासात नवे पर्व सुरू झाले आहे. त्यांच्या पुढील १४ दिवसांच्या संशोधनाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :Spaceअंतरिक्षisroइस्रो