शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

संतापजनक! मशिदीतून पाणी घेतल्याने पाकिस्तानमध्ये हिंदू कुटुंबाचा छळ; केली बेदम मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2021 12:25 IST

Hindu family in pakistan tortured : कुटुंबातील एक सदस्य तहान लागल्याने पाणी घेण्यासाठी जवळील एका मशिदीजवळ गेले होते. त्यावेळी काही स्थानिक जमीनदारांनी हल्ला करत त्यांना बेदम मारहाण केली.

इस्लामाबाद - पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात एका मशिदीतून पाणी घेतल्याने एक गरिब हिंदू शेतकरी कुटुंबाला छळाला सामोरे जावे लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. काही कट्टरतावाद्यांनी धार्मिक स्थळाच्या पावित्र्याचे उल्लंघन केल्याचे म्हणत हिंदू कुटुंबाचा खूप छळ केला आहे. या प्रकरणातील आरोपी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या पक्षाचे असल्याचे म्हटले जात आहे.

पाकिस्तानमधील 'डॉन'ने दिलेल्या वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, पंजाबमधील रहीमयार खान शहरात राहणाऱ्या आलम राम भील हे पत्नी व कुटुंबातील इतर सदस्यांसह शेतात काम करत होते. भील यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या कुटुंबातील एक सदस्य तहान लागल्याने पाणी घेण्यासाठी जवळील एका मशिदीजवळ गेले होते. त्यावेळी काही स्थानिक जमीनदारांनी हल्ला करत त्यांना बेदम मारहाण केली. त्यानंतरही शेतातून काम संपवून भील कुटुंबीय पुन्हा घरी परतत असताना त्यांना ओलीस ठेवण्यात आले.

मशिदीचे पावित्र्य भंग केल्याच्या आरोपाखाली हिंदू कुटुंबाचा छळ 

मशिदीचे पावित्र्य भंग केल्याच्या आरोपाखाली त्यांचा खूप छळ करण्यात आला. पोलिसांना यांनी या प्रकरणाची तक्रार दाखल करून घेतली नाही. आरोपी हे सत्ताधारी तहरीक-ए-इन्साफ पक्षाचे स्थानिक खासदारांशी संबंधित आहेत. भील यांनी पोलिसांच्या या निष्क्रियतेचा विरोध करण्यासाठी पोलीस ठाण्याबाहेर धरणे आंदोलन केले. इम्रान खान यांच्या पक्षाचे आमदार जावेद वारियाच यांनी तक्रार दाखल करण्यास मदत केली असल्याचे स्थानिक जिल्हा शांतता समितीचे सदस्य पीटर भील यांनी सांगितले.

ज्येष्ठ वकील आणि जिल्हा बार काउंसिलचे माजी अध्यक्ष फारूख रिंद यांनी सांगितले की, येथील वस्ती कहूर भागाशी संबंधित आहेत. या ठिकाणी भील एक दशकाहून अधिक काळापासून वास्तव्य करत आहे. त्यांनी म्हटले की, या ठिकाणचे हिंदू समुदायातील बहुतांशी सदस्य हे शेतात काम करणारे गरिब आहेत. आरोपी जमीनदार लहान-मुद्यांवर अन्य ग्रामीण नागरिकांना मारहाण करण्यासाठी कुख्यात आहेत. रिंद यांनी पीडित कुटुंबाला मोफत कायदेशीर मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानHinduहिंदूWaterपाणीMosqueमशिद