हिलरी यांचा दावा आणखी मजबूत
By Admin | Updated: March 19, 2016 01:35 IST2016-03-19T01:35:03+5:302016-03-19T01:35:03+5:30
हिलरी क्लिंटन यांनी डेमोक्रॅटिकच्या उमेदवारीसाठी आपला दावा आणखी मजबूत करताना पाच प्रायमरीत दणदणीत विजय मिळविला आहे. दरम्यान, बर्नी सँडर्स यांनी

हिलरी यांचा दावा आणखी मजबूत
वॉशिंग्टन : हिलरी क्लिंटन यांनी डेमोक्रॅटिकच्या उमेदवारीसाठी आपला दावा आणखी मजबूत करताना पाच प्रायमरीत दणदणीत विजय मिळविला आहे. दरम्यान, बर्नी सँडर्स यांनी मिसौरीत आपला पराभव मान्य केला आहे.
मिसौरी प्रायमरी निवडणुकीत १५०० मतांनी मागे असलेल्या सँडर्स यांनी पुन्हा मतमोजणीची मागणी करणार नसल्याचे स्पष्ट करीत पराभव मान्य केला. हिलरी यांनी सुपर ट्यूजडे २ मध्ये फ्लोरिडा, उत्तर कॅरोलिना, ओहोयो, इलिनोइस आणि मिसौरी येथे सँडर्स यांना पराभूत करीत विजय मिळविला. (वृत्तसंस्था)