शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
2
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच मान्सून दाखल होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
3
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
4
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
5
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
6
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
7
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!
8
'हॅलो, तुमच्या विमानात बॉम्ब आहे', एका फोनमुळे विमानतळावर गदारोळ; तत्काळ हाय अलर्ट जारी!
9
कोहलीसाठी कायपण! 'टेस्ट फेअरवेल' देण्यासाठी चाहत्यांनी आखलाय एकदम 'बेस्ट प्लॅन'; जाणून घ्या सविस्तर
10
शाम्पू, लोशन आणि बॉडी सोपमध्ये असतात कॅन्सर होणारे केमिकल्स; धडकी भरवणारा रिसर्च
11
जिगरबाज...! समुद्रात बुडणाऱ्या महिलेला वाचविण्यासाठी वाहतूक पोलिसाची पाण्यात उडी
12
'हा भारताचा स्पष्ट विजय', जगातील सर्वात प्रतिष्ठित संरक्षण तज्ज्ञाने पाकिस्तानला दाखवला आरसा
13
“इस व्यक्ति को जानते हैं?” WhatsApp वरचा 'हा' मेसेज अन् फोटो करू शकतो बँक खातं रिकामं
14
Recruitment: भारतीय लष्करात भरती होण्याची संधी; नेमकं काम काय? कोण करू शकतं अप्लाय? कधी? आणि कसं?... इथे वाचा!
15
जुन्या भांडणावरुन बाप-लेकाचा चाकू अन् लोखंडी पाईपने खून, बदनापूरमधील धक्कादायक घटना
16
BJP District President: ६ विभागात ५८ जिल्हाध्यक्षांची नियुक्ती; भाजपानं दिली नव्या चेहऱ्यांना संधी, वाचा यादी
17
युद्धविरामानंतरही डिफेन्स स्टॉक्स तेजीत; PM मोदींच्या विधानाने बदललं गणित
18
बाबा वेंगा यांची पाकिस्तानबाबत धक्कादायक भविष्यवाणी! ६ वर्षापूर्वी अभ्यासात उल्लेख होता
19
पाकिस्तानला काही सुधरेना! सिंधू जल करारावरून परराष्ट्र मंत्र्यांची दर्पोक्ती; म्हणे, तर युद्धविराम भंग होऊ शकतो!
20
Mumbai Metro 3: तुम्हाला माहित्येय का? सिद्धिविनायक मेट्रो स्टेशनला आहेत एकूण 7 Entry-Exit मार्ग, जाणून घ्या...

चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2025 19:38 IST

Chittagong hill tracts crisis, Bangladesh Govt: चितगाव हिल ट्रॅक्ट्स (CHT) मधील तीव्र आंदोलने बांगलादेशी सत्तेसमोरील सर्वात मोठे आव्हान

Chittagong hill tracts crisis, Bangladesh Govt: बांगलादेशच्या आग्नेय भागातील चितगाव हिल ट्रॅक्ट्स (CHT) मध्ये अन्यायाविरोधात उठवला जाणारा आवाज आता ढाक्यातील सत्तेसमोरील सर्वात मोठे आव्हान बनत चालले आहे. ज्याप्रमाणे पाकिस्तानने वर्षानुवर्षे बलुचिस्तानच्या आवाजाकडे दुर्लक्ष केले आणि आज तिथे सशस्त्र फुटीरतावादी चळवळ उभी राहिली आहे, त्याचप्रमाणे चितगाव देखील त्याच मार्गावर वाटचाल करत असल्याचे दिसून येते. चितगाव बांगलादेशचे बलुचिस्तान होईल का? असा प्रश्न बांगलादेशातील सत्ताधाऱ्यांना भेडसावत आहे. तशातच एका अहवालामुळे आणि अलिकडच्या घडामोडींमुळे युनूस सरकार मोठ्या अडचणीत सापडलेले दिसते आहे.

चितगाव बांगलादेशसाठी दुखरी नस बनू शकते...

१० मे २०२५ रोजी युनायटेड पीपल्स डेमोक्रॅटिक फ्रंट (UPDF) आणि राष्ट्रीय सहमती आयोगाची संसद भवनाच्या एलडी हॉलमध्ये बैठक झाली. या बैठकीत मिकाईल चकमा यांनी चितगाव पर्वतीय प्रदेशाच्या स्वायत्ततेच्या मागणीचा पुनरुच्चार केला. ही मागणी अनेक दशकांपासून केली जात आहे, परंतु सरकारने ती मागणी कधीही गांभीर्याने घेतली नाही. या दुर्लक्षामुळे आता चितगावमध्ये बंडखोरांचे प्राबल्य वाढताना दिसत आहे, जसे बलुचिस्तान हे पाकिस्तानसाठी 'दुखरी नस' बनली आहे.

बंगाली वस्ती आणि आदिवासींमधील संघर्ष

या बैठकीनंतर, बंगाली वसाहतीतील समर्थकांनी १२ मे रोजी रंगमती येथे एक रॅली आयोजित केली, ज्यामध्ये आदिवासी समुदायांविरुद्ध उघडपणे चिथावणीखोर विधाने करण्यात आली. बंगाली स्थलांतरित नेते काझी मुजीबुर रहमान म्हणाले की, आपली भाषा, आपले शरीरयष्टी किंवा आपले अन्न सारखे नाही. आपण त्यांच्याविरुद्ध स्वातंत्र्याची लढाई खूप आधीच सुरू करायला हवी होती. अशा भाषणांमुळे केवळ सामाजिक दुफळी वाढत नाही, तर परिस्थितीही चिघळत चालली आहे.

बलुचिस्तान आणि चितगावमधील परिस्थिती सारखीच कशी?

बलुचिस्तानप्रमाणेच चितगाव हा देखील खनिजे, जंगले आणि जैविक संसाधनांनी समृद्ध असा प्रदेश आहे. दोन्ही भागात स्थानिक आदिवासी लोकसंख्या बाहेरील लोकांमुळे त्रस्त आहे. बाहेरील लोकांमुळे तिथली संस्कृती, भाषा आणि ओळख दडपली गेली आहे. बलुच लोकांप्रमाणेच चकमा, मार्मा आणि जुम्मा समुदायांची ओळख संकटात आहे. दोन्ही भागात स्वायत्ततेच्या मागणीला 'देशद्रोह' म्हणून दाबण्याचा प्रयत्न झाला, परंतु त्याचे परिणाम दोन्ही देशांसाठी विनाशकारी असू शकतात.

टॅग्स :BangladeshबांगलादेशPakistanपाकिस्तान