Crime News: हरियाणामधील एका २६ वर्षीय तरुणाची अमेरिकेत गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मृतक हा त्याच्या वडिलांचा एकुलता एक मुलगा होता आणि अडीच वर्षांपूर्वी ४५ लाख रुपये खर्च करून तो डंकी रुटने अमेरिकेला गेला होता. प्रकरण फक्त इतकच होतं की तरुणाने एका व्यक्तीला सार्वजनिक ठिकाणी लघवी करण्यापासून रोखले होते. या सगळ्या घटनेमुळे तरुणाच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
हरियाणाच्या जिंद जिल्ह्यातील २६ वर्षीय कपिलची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. जिंदच्या एका गावातील कपिलने २०२२ मध्ये पनामाच्या जंगलातून मेक्सिकोची भिंत ओलांडून अमेरिकेत प्रवेश केला होता. त्यामुळे त्याला अटक करण्यात आली आणि खटला सुरु झाल्याने तो तिथेच राहू लागला. कपिलचे वडील शेतकरी आहेत. कपिलचे काका रमेश यांची पिल्लुखेडा येथे ट्रॅक्टर एजन्सी आहे. कपिलने काका रमेश यांच्याकडेच राहून शिक्षण पूर्ण केले होते. कुटुंबाला आधार देण्यासाठी कपिल ४५ लाख रुपये खर्चून डंकी रुटने अमेरिकेत गेला होता.
कुटुंबातील सदस्यांच्या म्हणण्यानुसार, अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये कपिल जिथे काम करायचा तिथे एक कृष्णवर्णीय मूळ अमेरिकन आला. जेव्हा या मूळ अमेरिकन व्यक्तीने लघवी करायला सुरुवात केली तेव्हा कपिलने त्याला तसे करण्यापासून रोखले. हे प्रकरण इतके वाढले की मूळ अमेरिकन व्यक्तीने कपिलवर अनेक गोळ्या झाडल्या. कपिलचा जागीच मृत्यू झाला.
अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये कपिल जिथे काम करायचा तिथे एक कृष्णवर्णीय मूळ अमेरिकन होता. जेव्हा अमेरिकन व्यक्तीने सार्वजनिक लघवी करायला सुरुवात केली तेव्हा कपिलने त्याला रोखले. हे प्रकरण इतके वाढले की मूळ अमेरिकन व्यक्तीने कपिलवर अनेक गोळ्या झाडल्या ज्यात त्याचा जागीच मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, कपिलच्या मृत्यूची बातमी त्याच्या एका नातेवाईकाने कुटुंबाला दिली, जो स्वतः बऱ्याच काळापासून अमेरिकेत राहत आहे. कपिलच्या मृत्यूची बातमी ऐकून संपूर्ण कुटुंबाला धक्का बसला आहे. कपिलचे कुटुंब त्याचा मृतदेह भारतात परत आणण्याची मागणी करत आहे. कपिलचा मृतदेह अमेरिकेहून भारतात आणण्यासाठी किमान १५ दिवस लागतील.