हर्ले-डेव्हिडसनच्या करावरून डोनाल्ड ट्रम्प यांचे भारतावर टीकास्त्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 01:58 IST2018-02-15T01:58:50+5:302018-02-15T01:58:57+5:30

जगप्रसिद्ध हर्ले-डेव्हिडसन मोटारसायकलींच्या आयातीवर भारत सरकारने लावलेल्या करावर अमेरिकी राष्टÑाध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टीका केली. भारतीय मोटारसायकलींच्या आयातीवरही अमेरिकेत कर लावण्याचा इशारा दिला आहे.

 Harley-Davidson tax on Donald Trump's India lecturer | हर्ले-डेव्हिडसनच्या करावरून डोनाल्ड ट्रम्प यांचे भारतावर टीकास्त्र

हर्ले-डेव्हिडसनच्या करावरून डोनाल्ड ट्रम्प यांचे भारतावर टीकास्त्र

वॉशिंग्टन : जगप्रसिद्ध हर्ले-डेव्हिडसन मोटारसायकलींच्या आयातीवर भारत सरकारने लावलेल्या करावर अमेरिकी राष्टÑाध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टीका केली. भारतीय मोटारसायकलींच्या आयातीवरही अमेरिकेत कर लावण्याचा इशारा दिला आहे.
भारत सरकारने महागड्या मोटारसायकलींच्या आयातीवरील कर ७५ टक्क्यांवरून कमी करून ५० टक्के केला आहे. ट्रम्प यांचे त्याने समाधान झालेले नाही. काँग्रेस सदस्यांशी स्टील उद्योगासंदर्भात झालेल्या चर्चेत ट्रम्प यांनी सांगितले की, भारत सरकारने महागड्या मोटारसायकलवरील कर ७५ टक्क्यांवरून ५० टक्के केला असला, तरी ते पुरेसे नाही. अमेरिकेत आयात मोटारसायकलींवर शून्य कर आहे. असेच धोरण भारत सरकारने ठेवले पाहिजे.
ट्रम्प म्हणाले की, अनेक देशांबाबत असे आहे की, आम्ही एखादे उत्पादन बनवितो, तेही उत्पादन बनवितात, आमचे उत्पादन त्यांच्या देशात पाठविण्यासाठी आम्ही प्रचंड कर भरतो, त्यांना मात्र काहीच द्यावे लागत नाही. पंतप्रधान मोदी यांच्यासोबतच्या संभाषणाचा उल्लेख करून ट्रम्प म्हणाले की, मला सांगितले की, आम्ही मोटारसायकलींवरील कर ७५ टक्क्यांवरून कमी करून ५० टक्के केला आहे. आम्ही कर १०० टक्क्यांवरून खाली आणला आहे.
ट्रम्प म्हणाले की, तुम्ही हर्ले-डेव्हिडसनवर ५० ते ७५ टक्के कर लावणार असाल, तर तुमच्या उत्पादनांवर लावायला आमच्याकडेही कर आहेत. (वृत्तसंस्था)

संबंधांचा गैरवापर
ट्रम्प म्हणाले की, आयात कर देवाण -घेवाणीच्या स्वरूपात असायला हवा. आम्ही तुमच्या उत्पादनांना जी वागणूक देतो, तीच तुम्ही अमेरिकेच्या उत्पादनांना दिली पाहिजे. अनेक देश अमेरिकेसोबतच्या व्यापारी संबंधांचा गैरवापर करीत आहेत.

Web Title:  Harley-Davidson tax on Donald Trump's India lecturer