Hello 2026! न्यूझीलंडमध्ये नववर्षाचे जंगी स्वागत; ऑकलंडच्या स्काय टॉवरवर फटाक्यांची आतषबाजी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 17:19 IST2025-12-31T17:15:54+5:302025-12-31T17:19:18+5:30
Happy New Year 2026 in New Zealand: जगभरात न्यूझीलंडने सर्वात आधी २०२६ या नववर्षाचे जल्लोषात स्वागत केले

Hello 2026! न्यूझीलंडमध्ये नववर्षाचे जंगी स्वागत; ऑकलंडच्या स्काय टॉवरवर फटाक्यांची आतषबाजी
Happy New Year 2026 in New Zealand: जगभरात सरत्या वर्षाला निरोप देऊन २०२६ या नववर्षाचे स्वागत करण्याची जय्यत तयारी सुरू आहे. जगात सर्वप्रथम न्यूझीलंड या देशाने नव्या वर्षाचे जल्लोषात स्वागत केले आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी ४.३०च्या सुमारास न्यूझीलंडमध्ये मध्यरात्रीचे १२ वाजले आणि संपूर्ण देश नववर्षाच्या आनंदाने न्हाऊन निघाला. न्यूझीलंडमधील ऑकलंड शहरात नववर्षाचे अत्यंत जंगी स्वागत करण्यात आले.
#WATCH | New Zealand's Auckland welcomes the #NewYear2026 with fireworks.
— ANI (@ANI) December 31, 2025
(Source: TVNZ via Reuters) pic.twitter.com/vybFTrAjeR
स्काय टॉवरवर नेत्रदीपक रोषणाई
ऑकलंडमधील ऐतिहासिक 'स्काय टॉवर' हे दरवर्षीप्रमाणे यंदाही आकर्षणाचे केंद्र ठरले. मध्यरात्रीचे १२ वाजताच या ३२८ मीटर उंच टॉवरवरून फटाक्यांची तुफान आतषबाजी करण्यात आली. सुमारे ५ मिनिटे चाललेल्या या नेत्रदीपक शोमध्ये ५०० किलोपेक्षा जास्त फटाक्यांचा वापर करण्यात आला. रंगीबेरंगी रोषणाई आणि आकाशात उमटणाऱ्या विलोभनीय छटांनी उपस्थितांचे डोळे दिपवून टाकले.
#WATCH | Fireworks adorn New Zealand's Auckland as it welcomes the #NewYear2026.
— ANI (@ANI) December 31, 2025
(Source: TVNZ via Reuters) https://t.co/BNqBWHimmlpic.twitter.com/hOdme8i36M
हजारो नागरिकांचा जल्लोष
या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी ऑकलंडच्या रस्त्यांवर आणि बंदराच्या परिसरात हजारो लोकांनी गर्दी केली होती. जसा मध्यरात्रीचा ठोका पडला, तसा 'हॅपी न्यू इयर'च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. लोकांनी एकमेकांना मिठी मारून आणि शुभेच्छा देऊन नव्या वर्षाचे स्वागत केले. भौगोलिकदृष्ट्या सर्वात आधी दिवस सुरू होणाऱ्या देशांपैकी न्यूझीलंड एक असल्याने, येथूनच जागतिक स्तरावर २०२५ च्या सेलिब्रेशनची अधिकृत सुरुवात झाली.
सकारात्मक ऊर्जेने वर्षाची सुरुवात
२०२४ या वर्षातील चांगल्या-वाईट स्मृतींना मागे टाकत, एका नव्या आशेने आणि सकारात्मक ऊर्जेने न्यूझीलंडच्या जनतेने २०२५ मध्ये प्रवेश केला आहे. ऑकलंडच्या या उत्सवाचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून, जगभरातील लोक या नेत्रदीपक सोहळ्याचे कौतुक करत आहेत. न्यूझीलंडनंतर आता ऑस्ट्रेलिया, जपान आणि हळूहळू संपूर्ण जग २०२५ च्या रंगात रंगणार आहे.