Hanuman Jayanti 2023: हनुमानाचे 'भक्त' आहेत बराक ओबामा, सोबत ठेवतात छोटी मूर्ती; पाहा VIDEO
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2023 17:10 IST2023-04-06T17:08:54+5:302023-04-06T17:10:09+5:30
Hanuman Jayanti 2023: एक मुलाखतीत अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी खिशातून हनुमानाची मूर्ती काढून दाखवली.

Hanuman Jayanti 2023: हनुमानाचे 'भक्त' आहेत बराक ओबामा, सोबत ठेवतात छोटी मूर्ती; पाहा VIDEO
Barack Obama, Hanuman Jayanti 2023: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना सर्वजण ओळखतात. ते अमेरिकेचे 44 वे राष्ट्राध्यक्ष राहिले आहेत. त्यांच्या अध्यक्षपदाच्या काळात अमेरिकेने अनेक महत्त्वाची कामी केली आहेत. 9/11 च्या दहशतवादी हल्ल्यातील प्रमुख आरोपी ओसामा बिन लादेनही ओबामा यांच्या कार्यकाळात मारला गेला होता. ओबामांची लोकप्रियता केवळ अमेरिकाच नाही तर जगभरात आहे. पण, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष भगवान हनुमानाचे मोठे 'भक्त' आहेत, हे तुम्हाला माहीत आहे का? एका मुलाखतीत ओबामांनी स्वतः सांगितले होते की, ते नेहमी हनुमानाची छोटी मूर्ती सोबत ठेवतात.
हनुमान जन्मदिनाच्या निमित्ताने आम्ही ओबामांच्या त्या मुलाखतीबद्दल सांगणार आहोत, ज्यात त्यांनी हनुमानजींची मूर्ती दाखवली होती. 2016 मध्ये यूट्यूब क्रिएटर निल्सनला दिलेल्या मुलाखतीत, ओबांना अशा गोष्टींबद्दल विचारण्यात आले, ज्या त्यांच्यासाठी वैयक्तिकरित्या खूप महत्वाच्या आहेत आणि ते नेहमी आपल्या खिशात ठेवतात. यावर ओबामा यांनी एकामागून एक अनेक गोष्टी काढल्या आणि सांगितले की, आयुष्यात जेव्हाही त्यांना थकवा येतो किंवा निराशा जाणवते, तेव्हा ते यांच्याकडून प्रेरणा घेतात.
हनुमानाची छोटी मूर्ती
अमेरिकेच्या माजी राष्ट्राध्यक्षांनी खिशातून काढलेल्या वस्तूंमध्ये हनुमानाची मूर्तीही होती. ही छोटी मूर्ती काढताना बराक ओबामा म्हणाले होते की, हिंदूंचा देव आहे आणि एका महिलेने त्यांना ही मूर्ती दिली होती. याशिवाय, ओबामा यांनी त्यांना भिक्षूने दिलेली बुद्ध मूर्ती, पोप फ्रान्सिसच्या मानकांची जपमाळ देखील दाखवली. बराक ओबामा यांचे वडील केनियाचे तर आई कॅन्ससची गोरी महिला होती. त्यांनी त्यांच्या आयुष्यातील काही सुरुवातीची वर्षे इंडोनेशियामध्ये घालवली, जिथे हिंदू धर्म लोकप्रिय धर्म आहे.
मुलाखतीदरम्यान ओबामा म्हणाले, "मी जेव्हापासून कार्यालयात जायला लागलो तेव्हापासून लोक मला काही ना काही भेट देऊ लागले. यातील काही गोष्टींना सोबत ठेवण्याची सवय मला लागली. यामुळे मला वाईट काळात खूप धीर मिळायचा. मी अंधश्रद्धाळू नाही, पण या गोष्टी सोबत असल्यामुळे मला त्या व्यक्तींबद्दल आणि त्यांच्यासोबत घालवेल्या आठवणींबद्दल चांगल्या गोष्टी आठवतात, असेही ते म्हणाले.