इस्रायली पुरुषांवर बलात्कार केल्याने हमास भडकला, आपल्याच Gay सहकाऱ्याला दिली थरकाप उडवणारी शिक्षा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2025 11:58 IST2025-02-06T11:56:51+5:302025-02-06T11:58:24+5:30
महत्वाचे म्हणजे, गाझामध्ये समलैंगिकता बेकायदेशीर आहे आणि त्यामुळे अनेक वर्षे तुरुंगवास किंवा मृत्युदंड होऊ शकतो.

इस्रायली पुरुषांवर बलात्कार केल्याने हमास भडकला, आपल्याच Gay सहकाऱ्याला दिली थरकाप उडवणारी शिक्षा
इस्रायलवरीलदहशतवादी हल्ल्यानंतर हमासने काही इस्रायली नागरिकांना ओलीस ठेवले होते. यात पुरुष, महिला आणि मुलांचा समावेश होता. ओलीस असताना इस्रायली नागरिकांवर अत्याचार करण्यात आला. हमासच्या एका समलिंगी दहशतवाद्याने ओलीस ठेवलेल्या इस्रायली पुरुषांवर बलात्कार केला. पॅलेस्टिनी समूहाकडील गुप्त कागदपत्रांवरून हे उघड झाले. यानंतर, जेव्हा हमासच्या सर्वोच्च कमांडरला यासंदर्भात माहिती मिळाली, तेव्हा त्याने त्याच्या समलिंगी सहकाऱ्याला शोधले आणि त्याची निघृन हत्या करण्यात आली.
न्यूयॉर्क पोस्टने दिलेल्या एका वृत्तानुसार, "हमासजवळ समलैंगिकतेत सहभागी असलेल्या दहशतवाद्यांची यादी होती. यासाठी त्यांना मोठी किंमत चुकवावी लागली आहे. अहवालानुसार, या लैंगिक गुन्ह्यात हमासचे तब्बल ९४ सैनिक सहभागी होते. या कागदपत्रांमधून मुलांवरील बलात्कारचा आणि छळचाही खुलासा झाला आहे.
माध्यमांतील वृत्तांनुसार, एका आरोपात म्हणण्यात आले आहे की, "हमासच्या दहशतवाद्यांमधील एक सदस्य सातत्याने देवाबद्दल वाईट बोलत असतो." आणखी एकाने म्हटले आहे की, "त्याचे फेसबुकवर रोमॅन्टिक संबंध आहेत. तो व्यवहारिक आणि नैतिकदृष्ट्या विचलित आहे." मात्र, हमासने त्या सर्व सदस्यांसोबत नेमके काय केले हे स्पष्ट होऊ शकलेले नाही.
महत्वाचे म्हणजे, गाझामध्ये समलैंगिकता बेकायदेशीर आहे आणि त्यामुळे अनेक वर्षे तुरुंगवास किंवा मृत्युदंड होऊ शकतो.
समलैंगिक संबंध असल्याच्या आरोपाखाली २०१६ मध्येही करण्यात आली होती एका कमांडरची हत्या -
माध्यमांतील वृत्तांनुसार, समलैंगिक संबंध असल्याच्या आरोपाखाली हमासचा माजी कमांडर महमूद इश्तवी याची २०१६ मध्ये हत्या करण्यात आली होती. हमासने त्याला तुरुंगात टाकल्यानंतर आणि त्याचा लटकवून अनन्वित छळ करण्यात आला होता. यानंतर जवळपास एक वर्षानंतर, त्याच्या छातीत तीन गोळ्या झाडून त्याची हत्या करण्यात आली होती.